कराडमध्ये गणरायाचे यावर्षी साधेपणाने आगमन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

कराडमध्ये गणरायाचे यावर्षी साधेपणाने आगमन

 
कराडमध्ये गणरायाचे यावर्षी साधेपणाने आगमन ...

कुलदीप मोहिते -कराड यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने नेहमी ढोल ताशाच्या गजरात आगमन होणारे गणरायाचे यावर्षी साधेपणाने आगमन झाले दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस गणेश सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली पाच महिने   कोरोना चा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे अशा परिस्थितीत कोरूना चा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले होते त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आहे शनिवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती घरगुती गणेशमूर्तींचे उत्साहात आगमन झाले मात्र नेहमी ढोल ताशा कोठेही जाणवला नाही काही सार्वजनिक मंडळांनी प्रथा खंडित होऊ नये यासाठी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर काही गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अध्यक्षांच्या घरी तर काही मंडळांनी देवळामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली

No comments:

Post a Comment