Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत जिल्हा रुग्णालयाला व्हेंटीलेटर भेट

 चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत जिल्हा रुग्णालयाला व्हेंटीलेटर भेट

अमूलकुमार जैन-मुरुड



सीएफटीआय ट्रस्टच्या वतीने चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या मार्फत व्हेंटीलेटर मशीन भेट देण्यात आले असून त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्णांना चांगला उपयोग होऊ शकेल. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांच्याकडे सदर व्हेंटीलेटर सूपूर्द करण्यात आले. डॉ पद्मश्री बैनाडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीएफटीआयच्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले.


कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात असताना रायगड जिल्हा देखील या महामारीच्या छायेतून वाचू शकलेला नाही. जिल्हा प्रशासन या संकटाचा सामना करीत असला तरी अनेक मर्यादा पडत आहेत. साडेसातशे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सीएफटीआयच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटीलेेटर मशीन भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीफटीआयच्या माध्यमातून व्हेंटीलीटर मशिन आज देण्यात आले.


सदर व्हेंटीलेेटर मशीन पोर्टेबल असल्याने रुग्णालयाबरोबरच रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेल्या रुग्णाला देखील उपयोगी पडणार आहेत. या मशिनना आठ तासांचे बॅटरी बॅकअप असल्याने त्याचा मोठा फायदा रुग्णाला होणार आहे.


सदर व्हेंटीलेटर मशिन सुपूर्द करताना चित्रलेखा पाटील यांनी सीएफटीआयच्या कार्याचा आढावा घेतला. कोरोनासारख्या आजाराशी लढताना जिल्ह्याचा वाढता मृत्यूदर कमी होण्यासाठी हे व्हेंटिलेटर मशिन उपयुक्त ठरावेत अशी आशा व्यक्त केली. तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांनी सीएफटीआयला धन्यवाद देत या व्हेंटीलेटरमुळे मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले.



औपचारीक कार्यक्रमानंतर सीएफटीआयचे अमित देशपांडे, रुपेश पाटील, अमोल नाईक यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई यांच्याकडे हे मशिन सुपूर्द केले.


चित्रलेखा पाटील यांनी सीएफटीआयच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात लाकडाऊनमुळे गोरगरीब गरजूंना सीएफटीआयच्या माध्यमातून चार हजार कुटुंबांना जीवनावश्यक अन्न धान्य आणि दैनंदिन भोजनासाठी लागणारं सगळं साहित्य पुरवण्यात आले. गावोगावी, वाड्या - वस्त्यांवर जाऊन सीएफटीआयनं भूकेनं व्याकूळ झालेल्यांना मदत पोचवली. कोरोनाचा विषाणू ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यापूर्वी सीएफटीआयचे जंतूनाशक फवारणी पंप प्रतिकारासाठी पोहचले. दोनशे गावांना जंतूनाशक फवारणी पंपांसह अडीच हजार लिटर जंतूनाशक औषधाचे वितरणही सीएफटीआयने केले. यातून अप्रत्यक्षरित्या तब्बल सव्वासहा लाख ग्रामस्थांना लाभ झाला. त्यानंतर अशा प्रकारचे व्हेंटिलेेटर मशिन देऊन आरोग्य व्यवस्थेला हातभार लावल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies