कोविड रुग्णालयाचे लोकार्पण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

कोविड रुग्णालयाचे लोकार्पण


कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

प्रियांका ढम-लोणी काळभोरपुण्यात शिवाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री  अजित  पवार  उपस्थित होते नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणं ही शासनाची प्राथमिकता आहे, त्यामुळेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणं सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसंच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयात मंगळवार सायंकाळपासून रुग्णसेवा देण्यास सुरूवात होईल. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा.

No comments:

Post a Comment