जनसेवा पॅनल वडगाव .,( उंब्रज) यांनी मांडला 2015 ते 2020 पर्यंत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

जनसेवा पॅनल वडगाव .,( उंब्रज) यांनी मांडला 2015 ते 2020 पर्यंत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा

 अँड. विनायकराव पाटील बापू

जनसेवा पॅनल वडगाव .,( उंब्रज) यांनी मांडला 2015 ते 2020 पर्यंत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा


कुलदीप मोहिते -कराड2015 रोजी ग्रामपंचायत विकास कामाचा लेखाजोखा निवडणुकीला सामोरे जाताना अँड.विनायकराव पाटील बापू जनसेवा पॅनेल तर्फे जी आश्वासने देण्यात आली होती ती जवळजवळ सर्व पूर्ण करत यश प्राप्त झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने वड गाव गावातील मुख्य रस्ता वडगाव ते पाल रोड वडगाव ते भांबे रोड व्यायाम शाळा मातंग वस्ती ,बौद्ध वस्ती अंतर्गत रस्ते स्मशानभूमी रस्ता गावठाण रस्ता गावात बंदिस्त गटार इत्यादी प्रकारची सर्व आश्वासने जी जाहीरनाम्यात दिले होते ती जवळजवळ सर्व पूर्ण झालेले आहेत यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी व संघटनेचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले आहे गेल्या पाच वर्षात वडगाव गावात विकास कामे झालीत त्यामध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा  सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री यांचा राहिला आहे तसेच सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील व मार्गदर्शक  देवराज दादा पाटील तसेच राष्ट्रवादी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील माने  व स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सौ जाधव  व माजी समाज कल्याण सभापती शेवाळे या सर्वांचा वडगावच्या विकासासाठी हातभार लागला आहे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून यांनी सुचवलेले गत पाच वर्षातील कामे पुढील प्रमाणे वडगाव गावातील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण नऊ लाख रुपये वडगाव ते पाल रस्ता एक कोटी 17 लाख स्मशानभूमी रस्ता चार लाख रुपये दलित वस्ती निधी मधून मातंग वस्तीत कॉंक्रिटीकरण रस्ता सहा लाख रुपये नवीन बेघरवस्ती कॉंक्रीट करण रस्ता पाच लाख रुपये बौद्ध वस्ती रस्ता तीन लाख रुपये वडगाव ते भांबे रस्ता सतरा लाख 53 हजार रुपये व्यायाम शाळा व साहित्य नऊ लाख रुपये असे सर्व मिळून एक कोटी 72 लाख रुपयांची भरीव अशी विकास कामे नामदार साहेबांच्या माध्यमातून झाले आहेत आपल्या सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निधीतून गावात दहा लाख रुपयांचा अंतर्गत रस्ता मंजूर झाला आहे तसेच खासदार याांनी वडगाव प्राथमिक शाळेला पाच संगणक संच भेट देण्यात आले गावातील कुठलीही अडचण असो कोणाचे वैयक्तिक काम असो खासदार साहेबांनी वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य केले आहे तसेच माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांच्या निधीतून बौद्ध वस्तीमध्ये तीन लाख रुपये रस्ता कॉंक्रिटीकरण काम झाले आहे. प सदस्य सौ जाधव यांच्या निधीतून गावांतर्गत रस्ता तीन लाख रुपये जोतिबा देवालय निधी दोन लाख रुपये तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील गरजू लोकांना कडबा कुट्टी मशीन बॅटरी पंप ताडपत्री लाभ देण्यात आला तसेच संघटनेच्या माध्यमातून 2014 साल जोतिबा देवाच्या समोर सभामंडप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून देण्यात आला वरील प्रकारची विकासकामे लोकप्रतिनिधींच्या निधीतून झाली आहेत ग्रामपंचायत 14 वित्त आयोग यामधून वडगाव गावात बंदिस्त गटार कामे कामे, गावठाण मधील डांबरीकरण रस्ता गाव अंतर्गत काँक्रीट रस्ता प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम प्राथमिक शाळा व अंगणवाडी स्मार्ट टीव्ही वाटप गावात संपूर्ण एलईडी बल्ब रमदास नगर स्मशानभूमीला शव दहिनी मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षण भिंत ,प्राथमिक शाळा संरक्षण भिंत अंगणवाडी एक्वागार्ड मशीन वाटप प्राथमिक शाळेसमोर पेव्हर ब्लॉक बसविणे अंगणवाडी खेळाचे साहित्य बौद्ध वस्तीतील समाज मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवणे मोफत आरोग्य शिबीर महिलांना उद्योजक प्रशिक्षण वर्ग .कोरोना काळात  साखळी वाढू नये याची काळजी घेतली .ग्रामपंचायतीने अशा सेविका अंगणवाडी सेविका पोलीस पाटील आपली कोरोना समिति यांनी पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली ग्रामपंचायतीने थर्मल स्कॅन मशिन मशीन ऑक्सिजन मिटर खरेदी केले व त्याद्वारे गावाची तपासणी केली तसेच गावात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या व सॅनिटायझर बाटली तसेच मास्क व साबण गावात घरोघरी वाटप केले गावात सॅनिटायझर फवारणी केली तसेच जयवंत शुगर कारखाना च्या माध्यमातून सॅनिटायझर फवारणी करण्यात आले  सर्व लोकप्रतिनिधी मिळून एक कोटी 95 लाख रुपयांची कामे अशी माहिती कार्याध्यक्ष सरपंच परिषद सातारचे कार्याध्यक्ष रणजीत पाटील  यांनी एका निवेदनाद्वारे दिली

No comments:

Post a Comment