Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खेडमध्ये 59 लाखांचा दरोडा टाकून पळालेल्या दरोडेखोरांना म्हसळ्यातून अटक ,पाच दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या...

 खेडमध्ये 59 लाखांचा दरोडा टाकून पळालेल्या दरोडेखोरांना म्हसळ्यातून अटक ,पाच दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या...

म्हसळा पोलिसांची जिगरबाज कामगिरी!


 अरुण जंगम-
महाराष्ट्र मिरर टीम रायगड


खेडमध्ये चाकूचा धाक दाखवून 59 लाखांचा दरोडा टाकून पळालेल्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात म्हसळा पोलिसांना यश आले आहे. म्हसळा शहरातील नवा नगर परिसरातील जंगलात वेषांतर करुन हे दरोडेखोर दबा धरुन बसले होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. म्हसळा आणि खेड पोलिसांनी संयुक्त कामगिरी केली. 



खेड येथील भरणा नाका परिसरात या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत 59 लाखांचा दरोडा टाकला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 395, 420, 341, 427 अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान त्यातील काही जण दरोडा टाकल्यानंतर म्हसळ्याच्या दिशेने पळाल्याचे निषपन्न झाले होते. पोलीस अधीक्षक रायगड यांनी म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना या गुन्ह्यात खेड पोलिसांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


त्यानुसार म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चव्हाण, हंबीर, खाडे, तोरसल्ले यांचे पथक तयार करण्यात आले. दरोडेखोरांची माहिती घेत या पथकाने म्हसळा शहरात गोपनीयरित्या तपास केला. सदर तपासात कोणतेही नाव व वर्णन नसल्याने दरोडेखोरांचा शोध केवळ तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे करावा लागत होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. 


तपास पथकाने म्हसळा शहरातील नवा नगर परिसरात वेषांतर करुन जवळच्या जंगलात लपून राहिलेल्या संशयितांचा शोध घेतला. अखेर नरेश वसंत चव्हाण, प्रमोद रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, अंकुश पंढरीनाथ चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास चालू असताना खेड पोलीस ठाण्याचे पथकदेखील सहभागी झाले होते.


दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कमी वेळेत म्हसळा पोलीस व खेड पोलीस यांच्या संयुक्त कामगिरीने दरोडेखोरांना ताब्यात घेऊन खेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मढवी, हंबीर, चव्हाण, खाडे, तोरसल्ले, खेड पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस नाईक अंबेडे, जोशी, कडू यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies