Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रस्त्यावरील खड्डे बुजविण्या बाबत भाजपतर्फे बांधकाम विभागाला निवेदन

 रस्त्यावरील खड्डे बुजविण्या बाबत भाजपतर्फे बांधकाम विभागाला  निवेदन

ओंकार रेळेकर-चिपळूणसंपूर्ण देशावरती कोरोना या महामारीचे संकट उभे आहे. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गावरील अवजड वाहतूक बंद होती. आणि यामुळेच राज्य सरकारचे रस्त्य‍ांकडे दुर्लक्ष झाले. यंदाच्या पावसाने रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि यामुळे काही निष्पाप जीवांचा यात नाहक बळी जात आहे याचाच निषेध व्यक्त करत भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिपळूणचे उपअभियंता श्री.रणदिवे आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चिपळूणचे उपअभियंता अरविंद टी.के.  यांना रस्त्यावर पडलेले खड्डे भरणेबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोदजी भोबस्कर, चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, कोकण विकास आघाडी मुंबईचे उपाध्यक्ष विनोद दळवी, जिल्हा चिटणीस वैशालीताई निमकर, संतोष वरेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, जिल्हा प्रसिद्धी संयोजकसंदेश ओक, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies