सांगलीच्या पोलीस अधिक्षकपदी दीक्षित कुमार गेडाम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

सांगलीच्या पोलीस अधिक्षकपदी दीक्षित कुमार गेडाम

 सांगलीच्या पोलीस अधिक्षकपदी दीक्षित कुमार गेडाम 

सुहैल शर्मा यांची बदली. 

उमेश पाटील  -

महाराष्ट्र मिरर टीम-सांगलीसांगलीचे पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश गृह विभागाच्यावतीने प्राप्त झाले. सुहैल शर्मा यांनी अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. मात्र, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेशात नमूद केले आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे २०११ मध्ये आय.पी.एस झाले. बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांनी स्वत: पहाटे ५ वाजता डोंगर-दऱ्यामध्ये जाऊन तेथे असणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई केली आहे 2017 पासून आय.पी.एस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम हे

सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते.

No comments:

Post a Comment