अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आयपीएस कृष्णप्रकाश यांनी स्वीकारला पदभार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2020

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आयपीएस कृष्णप्रकाश यांनी स्वीकारला पदभार


 

सावधान! पिंपरी-चिंचवड होणार गुन्हेगारी मुक्त!


अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आयपीएस कृष्णप्रकाश यांनी स्वीकारला पदभार 

प्रियांका ढम-पुणे

खाकी शान अन् खाकीच जान’ अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारे १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पोलीस खात्यातील पहिले आयर्नमन, उत्तम शायर, पोलीस खात्याला कुटुंब समजून कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा अर्थात अंमलदाराला प्रेमळ वागणूक देणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व पिंपरी-चिंचवडकरांना लाभले. कर्तव्याशी प्रामाणिक अन् लोकसेवेला प्रथम प्राधान्य अशी कायम भूमिका असल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हेगारीमुक्त होणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

   


नुकत्याच ४५ वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या शासनाने बदल्या केल्या. त्यात आयपीएस कृष्णप्रकाश यांचेही नाव होते. कृष्णप्रकाश यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी करण्यात आली. यापूर्वी ते पोलीस महासंचालक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) पदी कर्तव्य बजावत होेते. कृष्णप्रकाश हे कधी पदभार स्वीकारतील याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना त्यांनी अगदी शानमध्ये शनिवारी मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. 

   आयपीएस कृष्णप्रकाश यांच्या रूपात पिंपरी-चिंचवड पोलिसांना कर्तव्य दक्ष पोलीस कुटुंब लाभल्यामुळे पोलिसांमध्येही आवश्य आनंदाचे वातावरण पाहावयास मिळेल. पोलीस खात्यात आनंदी वातावरण होण्यालाही पूर्व इतिहास आहे. हाताखाली काम करणाºयांना कायम सोबत घेऊ न काम करणारे आयपीएस अधिकारी म्हणून कृष्णप्रकाश यांची स्वतंत्र ओळख आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई पोलीस खात्यातील ‘कॉम्प्यूटर मॅन’! 

   पोलीस शिपाई (बक्कल नं. 03875) किरण काशिनाथ खटावकर यांचे कॉम्प्यूटरवर असलेली उत्तम कमांड पाहून आयपीएस कृष्णप्रकाश (तत्कालीन सह पोलीस आयुक्त - कायदा व सुरक्षा ) यांनी ‘कॉम्प्यूटर मॅन’ ही उपाधी पोलीस शिपाई किरण खटावकर यांना देऊ न त्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर अंमलदाराच्या बढतीनंतर स्वत: ‘पोलीस फित’ लावली. सदर प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने आयपीएस कृष्णप्रकाश यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक झाले. तसेच सन २००८-२०१० या कालावधीत सांगली पोलीस अधीक्षकपदी कर्तव्य बजावताना कृष्णप्रकाश यांनी गुन्हेगारी मोडीत काढली. मटका, जुगारअड्डे चालवणाºयांचे धाबे दणाणले. इतकेच नव्हे तर सर्व सामान्यांच्या तक्रारी लोकांमध्ये जाऊ न जाणून घेत अन् त्यावर तात्काळ तोडगा काढत.     पोलीस कुटुंबातील प्रेमळ उच्च अधिकारी यापलीकडे कृष्णप्रकाश यांची उत्तम खेळाडू अशी ओळख आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाºया ‘फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धेत #कृष्णप्रकाश यांनी बाजी मारली. ४ किमी स्विमींग, १८६ किमी सायकलिंग, ४२ किमी रनिंग या विविध क्रीडा प्रकारांची स्पर्धा अवघ्या १४ तास १० मिनिटांत पूर्ण करणारे आयपीएस कृष्णप्रकाश हे पोलीस दलातील पहिले अधिकारी ठरले. या स्पर्धद्वारे कृष्णप्रकाश यांच्या नावाची पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद झाली. कृष्णप्रकाश यांची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणा ठरल्याने त्यानंतर #पोलीस खात्याला आणखी #आयर्नमॅन लाभले. 

    असे विविध गुण अंगी असलेले आयपीएस कृष्णप्रकाश यांना पिंपरी-चिंचवड आयुक्त पदी विराजमान झाल्याबद्दल महाराष्ट्र मिरर टीम  पुणे परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment