Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हेल्प फौंडेशन आयोजित मोफत ह्दयरोग व मधुमेह तपासणी शिबीर

 हेल्प फौंडेशन आयोजित मोफत  ह्दयरोग व मधुमेह तपासणी शिबीर


ओंकार रेळेकर-चिपळूण

जागतिक ह्दयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर हेल्प फौंडेशन चिपळूणने हदयरोग व मधुमेह तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरातंर्गत सर्व तपासण्या माधवबाग चिपळूणतर्फ होणार आहेत. सदरचे शिबीर दि. २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.*सध्या कोरोना व सारीची साथ सुरु आहे. अशा महामारीच्या काळात आपण किती तंदुरस्त आहोत याची वैद्यकीय खात्री करणे महत्वाचे आहे. या शिबीरातर्गत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती(इम्युनिटी) किती आहे याची खास करुन तपासणी केली जाईल. याशिवाय रक्तदाब,तापमान,नाडी परिक्षण, शरीरातील ऑक्सीजन प्रमाण, बॉडी मास इंडेक्स, साखरेचे प्रमाण तपासणी केली जाईल. या सर्व तपासण्या मोफत असून तज्ञांचे मार्गदर्शनासह एमआयबी पल्स अॅप आणि हेल्थ कार्डही आपणास दिले जाईल.

जर गरज वाटली तर ईसीजी व एचबीए १सी ही चाचणी केल्यास खास सवलतीत करण्यात येईल.

जागतिक ह्रदयरोगदिन व महामारीचे संकटात आपल्या निरोगी स्वास्थासाठी हेल्प फोंडेशन संस्थेने माधवबाग चिपळूणच्या    सहकार्यातून आयोजन   करण्यात आलेल्या या मोफत शिबीराचा लाभ नागरिकांनी जरुर घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या करिता नावनोंदणीसाठी ०२३५५- २६१००७ वा ८१७७९८२९९० या क्रमांकावर संपर्क करावा सदरचे शिबीर  माधवबाग, स्प्रींग क्लीनिक जवळ, स्वरविहार, खेंड चिपळूण येथे सुरु असणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies