राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी डॉ. ओमकार माळी यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी डॉ. ओमकार माळी यांची नियुक्ती

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी डॉ. ओमकार माळी यांची नियुक्ती 

महाराष्ट्र मिरर टीम -ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने डॉ. ओमकार माळी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी डॉ. ओमकार माळी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व रॊजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र दिले.  आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांनुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, अशी अपेक्षा महेबुब शेख यांनी व्यक्त केली आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते डॉ. ओमकार माळी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.  डॉ. ओमकार माळी यांच्या नियुक्ती बद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी अभिनंदन केले आहे. 
  यावेळी पंकज सिन्हा, महेश भाईजे, सौरभ तोरस्कर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment