चिपळूण भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस सेवा सप्ताह साजरा होणार! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

चिपळूण भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस सेवा सप्ताह साजरा होणार!

 चिपळूण भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस सेवा सप्ताह साजरा होणार!


ओंकार रेळेकर-चिपळूण
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे हा कार्यक्रम १४ ते २० सप्टेंबर रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपा चिपळूणच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या कार्यक्रमा संदर्भात नियोजन करण्यात आले. तसेच नवीन नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या.  ही बैठक भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथील उत्तर रत्नागिरी संपर्क कार्यालयात नुकतीच झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७० वा जन्मदिवस असून राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार १४ ते २० सप्टेंबरपर्यंत (सेवा सप्ताह) अंतर्गत स्वछतेचा कार्यक्रम प्रत्येक बुथवर करण्यात यावा, प्रत्येक जि. प. गट तसेच पं. स. गणात त्या विभागातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, भाजपा मोर्चा, आघाडी, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाळेमध्ये,स्वछता , आरोग्य केंद्रामध्ये रूग्णांना फळवाटप असे कार्यक्रम राबविण्याचे ठरले. 


चिपळूण तालुका चिटणीस सौ. अश्विनी धामापूरकर यांची गुढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सौरभ चंद्रकांत चव्हाण, ( मार्गताम्हाणे ) यांची भाजपा उद्योग आघाडी तालुका संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली. 

 प्रसन्ना रविंद्र जाधव (कुडप) यांची भाजपा ओबीसी मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.  जितेंद्र सोनू खेतले यांची भाजपा ट्रान्सपोर्ट सेल तालुका संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना नियुक्ती पत्र चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा चिटणीस परिमल भोसले, उत्तर रत्नागिरी भाजपा युवा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, चिपळूण तालुका सरचिटणीस  वसंत ताम्हणकर, मारूती होडे, तालुका उपाध्यक्ष संदिप सुखदरे, कामगार आघाडी तालुका संयोजक  गणेश नलावडे, अध्यात्मिक समन्वय तालुका संयोजक प्रकाश तांबिटकर, कोषाध्यक्ष अजित थरवळ, तालुका चिटणीस ओंकार बापट, युवा कार्यकर्ते शरद तेवरे, अजित खेतले उपस्थित होते. चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तर वसंत ताम्हणकर यानी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment