एमएमआरडीए व ठेकेदाराचा हलगर्जीपणा जीवावर बेतला - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

एमएमआरडीए व ठेकेदाराचा हलगर्जीपणा जीवावर बेतला

 एमएमआरडीए व ठेकेदाराचा हलगर्जीपणा जीवावर बेतला

म्हसळ्यातील युवकाचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू,बॅरिकेट्स अंगावर पडून एक जण ठार तर एक जण जखमी

अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

महाराष्ट्र मिरर टीम -मुंबईमूळचा रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घोणसे येथील मनोज काशीनाथ पवार हा आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून कांदिवली हायवेवरून प्रवास करत असताना वाऱ्याने हे लोखंडी बॅरिकेट्स मनोजच्या दुचाकीवर पडलं त्यात मनोजचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.दोघांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता मनोजला  डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमींवर उपचार सुरू केले.दरम्यान हा अपघात केवळ एमएमआरडीए आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रायगड जिल्ह्यातून केली जात आहे.

No comments:

Post a Comment