पत्रकार संतोष पवार यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 9, 2020

पत्रकार संतोष पवार यांचे निधन

 पत्रकार संतोष पवार यांचे निधन

हरहुन्नरी पत्रकार गमावला ,सर्वच क्षेत्रातुन दुःख व्यक्त

महाराष्ट्र मिरर टीम कर्जतमहाराष्ट्र न्यूज 24 या युट्युब वृत्त वाहिनीचे संपादक संतोष धोंडू पवार यांचे नुकतेच निधन झालं असून त्यांच्या या आकस्मिक जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त आहे.अत्यंत कल्पक बुद्धी असलेले संतोष पवार यांनी सकाळ मधून पत्रकारितेला सुरुवात केली.शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर ते कार्यरत होते.

माथेरान येथे पतपेढीवर सचिव होते.तसेच माथेरान नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही काम पाहिले.पहिल्यांदा त्यांनी रायगड माझा ही वृत्तवाहिनी सुरू केली तिला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना त्यांनी ही वृत्तवाहिनी महाराष्ट्र स्तरावर नेले आणि एक अग्रगण्य वाहिनी बनवली.सकाळी त्यांना कर्जतच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत असताना त्यांना ऑक्सिजन लावून नवी मुंबई येथे हलवण्यात आले मात्र चौक येथे गेल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.एक हरहुन्नरी आणि कल्पक बुद्धी असलेला पत्रकार गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment