शरदभाऊ जठार, विजय कोरडे आणि नंदकुमार गोपाळे पुरस्काराने सन्मानित - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2020

शरदभाऊ जठार, विजय कोरडे आणि नंदकुमार गोपाळे पुरस्काराने सन्मानित

 वर्ल्ड काॅन्सिट्युशन अँड पार्लमेंट असोशिएशन" च्या वतीने पै.शरदभाऊ जठार ,.विजय कोरडे व नंदकुमार गोपाळे " यांना वर्ल्ड पार्लामेंट कोरोना वारीअर्स" पुरस्काराने सन्मानित.

तरोनिश मेहता-पुणेपुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागात सामाजिक बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यकर्ते अतिशय अभ्यासू व्यक्तीमहत्व, सामाजिक बांधिलकी जपणारे,समाजाचा सर्व स्तरातील सखोल अभ्यास असणारे विजय भाऊ कोरडे व   नंदकुमार स.गोपाळे उपसरपंच पै.शरदभाऊ जठार यांच्या कोरोना काळात करत आसलेल्या सामाजिक कामाची दखल आपल्या देशातच नाही तर "वर्ल्ड काॅन्सिट्युएशन अॅड पार्लमेंट असोशिएशन" या संघटनेने घेतली असून त्यांना "वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वाॅरियर्स" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रसंघाच्या बुध्दीजीवी गटाचे (युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल) भारताचे सदस्य"वर्ल्ड काॅन्सिट्यूशन अॅड पार्लमेंटचे असोशियशनचे" महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष व जेष्ठ क्रिकेट समीक्षक श्री.दत्ता विघावे यांच्या हस्ते देण्यात आला .सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची पोच या पुरस्काराच्या स्वरुपात मिळाली. पश्चिम भागातील सामाजिक युवा कार्यकर्त्यांच्या सन्मानामुळे भागाचे नाव रोशन झालेलं आहे.

त्यामुळे सर्व स्तरातून भागात या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment