जिल्हा पुरवठा शाखेचे वाहनचालक विनोद तांबे यांची करोनावर यशस्वी मात - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

जिल्हा पुरवठा शाखेचे वाहनचालक विनोद तांबे यांची करोनावर यशस्वी मातजिल्हा पुरवठा शाखेचे वाहनचालक विनोद तांबे यांची करोनावर यशस्वी मात

      महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग     जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा शाखेचे वाहनचालक विनोद तांबे हे दि.5 सप्टेंबर रोजी करोनाबाधित झाले होते. मात्र मनाचा निश्चय, आत्मविश्वास, योग्य आहार व उपचार  आणि गृहविलगीकरणाचे सूत्र याच्या आधारे श्री.तांबे यांनी करोनावर यशस्वी मात केली.

         आज दि. 21 सप्टेंबर रोजी तांबे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व वाहनचालकांनी  मिळून पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी महेंद्र महाडीक (मयूर), स्वप्नील माळवी, स्वप्नील म्हात्रे, किशोर म्हात्रे, हेमंत पाटील, राजा मांडवकर, राकेश म्हात्रे,   महाले, गायकवाड हे उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी  तांबे यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment