अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत उभी आहे टेकूवर! मोडकळीस - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत उभी आहे टेकूवर! मोडकळीस

 अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत उभी आहे टेकूवर!

मोडकळीस आलेल्या इमारतीच्या बाजूलाच थाटली कोव्हीड चाचणी प्रयोगशाळा.

       अमूलकुमार जैन ---अलिबाग    
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत सुमारे 40 वर्षे  जुनी व जीर्ण झाली असून इमारतीच्या एका बाजूला तर ती पडू नये म्हणून टेकू लावले असल्याचे चित्र समोर आले आहे. अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्यासह अलिबागेतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, संजय सावंत आदी सातत्याने या इमारतीमुळे रूग्ण, डाॅक्टरांसह कर्मचा-यांचा जीव धोक्यात असल्याचे वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत. परंतु सरकारकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने या सर्वांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाड सारखी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येते व चौकशीचा फार्स सुरू होतो. परंतु जाणारे जीव जातात अशी खंत या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


       विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अलिबाग येथील ज्या शासकीय आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्घाटन अलिकडेच ऑनलाईन केले त्याच्या बाजूलाच जिल्हा शासकीय इमारतीला टेकू लावले गेले आहेत हे विशेष गेल्यावर्शी या इमारतीचा स्लॅब कोसळू लागल्याने हे लोखंडी पोल टेकू म्हणून लावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे..

सदरची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा अभिप्राय महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास मंडळाने शासनाला दिला असल्याने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अदयावत इमारतीसाठी रू. 30 कोटींचा निधी येत्या अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध करून दयावा अषी मागणी काॅंग्रसचे अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना फेब्रुवारी 2020 मध्ये पत्र लिहून केली होती. आरोग्य मंत्री यांना लिहीलेल्या पत्रामध्ये ठाकूर यांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला साधारण 40 वर्षे झाली आहेत. यामुळे आतील आरसीसी बांधकाम कमकुवत झाले आहे. छताला मोठ्या प्रमाणात गळती लागत असल्याने वरती कच्ची  शेड टाकण्यात आली आहे. माजी आमदार म्हणून ठाकूर सन 2015 पासून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहेत. विधीमंडळाच्या अधिवेषनामध्ये तारांकीत प्रश्न उपस्थित केला गेला होता. विधानमंडळ सचिवालयाने आरोग्य विभागास त्या वेळी 8 मे 2015 पूर्वी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु अदयापही काहीच झालेले नाही. काही लोकांचा जीव गेल्याषिवाय सरकारला जाग येत नाही का? असा संतप्त सवाल आता माजी आमदार मुधकर ठाकूर यांनी विचारला आहे. या धोकादायक इमारतीमुळे रायगड जिल्हयाच्या मुख्यालयी अलिबाग येथे असलेल्या या जिल्हा रूग्णालयात येणा-या हजारो रूग्णांसह, त्यांचे नातेवाईक, डाॅक्टर्स, नर्सेस यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अदयावत इमारतीसाठी रू. 30 कोटींचा निधी येत्या अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध करून देणे बाबत आरोग्यमंत्री यांनी आदेश निर्गमीत करावेत अशी विनंती माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment