Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जतसह जिल्हाभरात सूरू आहे पोषण आहार जनजागृती

 कर्जतसह जिल्हाभरात सुरू आहे पोषण आहार जनजागृती 


 महिला बालविकास व आदिवासी विकास विभागाकडून पोषण माह होतोय साजरा


ज्ञानेश्वर बागडे/सोहेल शेख

महाराष्ट्र मिरर टीम कर्जत


                         (सर्व छायाचित्रे-दिनेश हरपुडे)

पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियाना अतंर्गत सर्व देशभरार महिला बाल विकास विभाग ,आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येतो आहे .


 रायगड जिल्ह्यात या अभियानास सात सप्टेंबर पासून सुरूवात झाली असून तीस सप्टेंबर पर्यत जिल्ह्यातील सर्व गावागावा मधूनच पोषण आहार जनजागृती केली जात आहे .

  रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे याचे हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले असून जिल्हाधिकारी निधी चौधरी ,मूख्यकार्यकारी आधिकारी डाँ किरण पाटील याचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे महिला बाल विकासचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन मंडलीक ,जिल्हा आरोग्य आधिकारी डाँ सूधाकर मोरे ,एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प आधिकारी शशिकला अहिरराव यांचे प्रत्यक्ष सहभागाने हा पोषण माह साजरा होतो आहे .


 जिल्ह्यातील कुपोषण कमी करणे ,माता व बालमृत्यू रोखने ,किशोरवयीन मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणे आदि उद्देशाच्या परिपुर्तेसाठी गावास्तरावर प्रभातफेरी काढणे ,कुपोषीत मुलांच्या घरी भेटी देणे ,गरोदरपणात  महिलानी घ्यावयाच्या काळजी बाबत माहिती देणे ,स्तनपान योग्य पध्दतीने कसे करावे या बाबत मार्गदर्शन करणे आदि उपक्रमात या मोहिमेत राबवले जात आहेत .

      सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समतोल व गरम ताजा आहार महत्वाचा घटक असून हा या आहारात रायगड जिल्ह्यातील जंगलात मिळणा-या रानभाज्यचे प्रदर्शन भरवणेया रानभाज्या मधुन मिळणाऱ्या वेगवेगळ्या जीवनसत्वाची माहिती दिली जात आहे .


प्रत्येक अगंवाडीत मध्ये अगंणवाडी सेविका ,आशा वर्कर त्या भागातील प्राथमीक आरोग्य केन्द्रचे आरोग्य आधिकारी कर्मचारी स्थानिक सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते यांच्या समन्वयातून तर शासकीय आदिवासी आश्रमशाळामध्ये सुध्दा मूख्यध्यापक ,अधिक्षक ,

अधिक्षीका ,शिक्षक आदी कर्मचारी सोशल डिस्टन्स व कोरोनाचे सर्व नियम पाळत हे अभियान राबवत आहेत .


नितीन मंडलीक उपमुख्यकार्यकारी आधिकारी ,रायगड जिल्हापरिषद 

कुपोषणकमी करण्यासाठी अगंणवाडीमध्ये शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम अमृतआहार योजना ,गरम ताजा आहार व नियमीत आरोग्य तपासणी हे उपक्रम राबवले जात आहेत . शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे .अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,पर्यवेक्षिकाच्या व प्रकल्प अधिकारी याच्या समन्वयाने सर्व जिल्हाभर हा पोषण माह मोहिमेच्या स्वरुपात राबवला जात आहे .

शशिकला आहिरराव ,

प्रकल्प आधिकारी ,एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प पेण 

पोषण माह मध्ये प्रत्येक आश्रमशाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शन भरवले जात असून कोविडची काळजी घेत आदिवासी किशोर वयीन विध्यार्थ्यांना आमच्या शिक्षकामार्फत लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत .


 अशोक जंगले 

 सदस्य नवसंजीवन समिती .

संचालक कँन प्रकल्प ,कर्जत 


या मोहिमेच्या माध्यमातून पोषणाचे धडे दिले जात असून फक्त एक महिनाच ही मोहीम न राबवता या मोहीमेत आखलेले सर्व कार्यक्रम हे नियमीत स्वरूपात घेतले जावेत अपूर्ण व कमी पोषण हे कुपोषणाचे महत्वाचे कारण असून या मोहीमेतून पोषण भरनावर जन जागृती केली जात आहे .Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies