"फुलपाखरांची बाग" निर्माण करण्याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम!!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

"फुलपाखरांची बाग" निर्माण करण्याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम!!!

"फुलपाखरांची बाग" निर्माण करण्याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम!!!

अमूलकुमार जैन-मुरुड

उरण तालुक्यातील पागोटे या गावी तेथील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तालुक्यातील तरूणांनी ‘ फुलपाखरांची बाग ‘ निर्माण करण्याचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाचा शुभारंभ पागोटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रशस्त आणि पर्यावरणाला पोषक अशा निसर्गरम्य मैदानात फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या फूलझाडांचे रोपण करून संपन्न झाला.‘ बहर ‘ या निसर्गप्रेमी संघटनेच्या वैभव पाटील, हरिश पाटील, अनूज पाटील, अंगराज म्हात्रे, सुरेंद्र पाटील, दौलत पाटील, आदी तरूण पर्यावरणप्रेमी तरूणांच्या संकल्पनेतून ही बाग उभारण्यात येत आहे.

या संघटनेतील वैभव पाटील हा कार्यकर्ता फुलपाखरांच्या विविध प्रकारांचा अभ्यासक आहे. आतापर्यंतच्या संशोधनात त्यांनी उरण-पनवेल विभागात 67 प्रकारच्या विविध फुलपाखरांची नोंद केलेली आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘सी बर्ड ‘ नावाची पक्षांचा अभ्यास आणि नोंद करणारी एक प्रमुख संस्था आहे. पागोटे गावचे वैभव पाटील हे सदरहू संस्थेच्या वेबसाईटवर फुलपाखरे/पक्षी यांची नोंद करणारे रायगड जिल्ह्यातील एक क्रमांकाचे अभ्यासक आहेत. पागोटे येथील फुलपाखरांच्या बागेत लवकरच फुलपाखरांची गर्दी होऊन ते नागरिकांचे विशेषतः लहान मुलांचे आकर्षणाचे केंद्र बनेल असा विश्वास या तरूणांनी व्यक्त केला.


या फुलपाखरांची बाग निर्माण करण्याच्या कार्यात पागोटे ग्रामपंचायतीचे सुविद्य सरपंच भार्गव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ‘बहर’ संघटनेच्या तरूणांनी केला.

No comments:

Post a Comment