पत्रकार संतोष पवार यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला शोक - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 9, 2020

पत्रकार संतोष पवार यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला शोक

 पत्रकार संतोष पवार यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला शोक


या प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा प्रशासनाला दिले तात्काळ निर्देश


     महाराष्ट्र मिरर टीम-अलिबागकर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कराेनामुळे अकस्मात निधन झाल्याचे समजताच मला धक्काच बसला असून याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

       एक अजातशत्रू,  दिलखुलास, समाजहितासाठी सतत लढणारा पत्रकार म्हणून  संतोष पवार यांची एक चांगली ओळख होती. मात्र अशा चांगल्या व्यक्तीचे आपल्यातून असे अचानक जाण्याने जिल्ह्याची आणि प्रसारमाध्यम क्षेत्राची हानी झाली आहे.अवघ्या दहा-पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी माझी व्यक्तिशः भेट घेऊन अनेक महत्वाच्या विषयांबाबत सकारात्मक चर्चा केली होती, असे सांगून पालकमंत्री तटकरे यांनी तात्काळ या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून कराेना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षमतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

No comments:

Post a Comment