Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हमीभावने मूग खरेदीला दि.१ ऑक्टोबर पासून सुरुवात

 हमीभावने मूग खरेदीला दि.१ ऑक्टोबर पासून सुरुवात


शेतकऱ्यांनी हमी भावाने मूग खरेदीसाठी नोंदणी करावी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन


महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई, 





हमीभावाने मूग,खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दि.३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून  राज्यात दि.१ ऑक्टोबर  २०२० पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून  ही खरेदी प्रक्रिया पुढे ९० दिवस सुरू राहणार आहे अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

दि.१५ सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे.विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे-२९, मार्केटिंग फेडरेशन-१०५,महाएफपीसी-४७ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत २३० शेतकऱ्यांनी मुगाची नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहनही पणन मंत्री श्री. पाटील यांनी केले.



नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार  मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. 

हंगाम २०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग हमी भाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. 

सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies