माणकिवली कडाव रस्त्याने घेतला मोकळा श्वास!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 8, 2020

माणकिवली कडाव रस्त्याने घेतला मोकळा श्वास!!

 माणकिवली कडाव रस्त्याने घेतला मोकळा श्वास!!

सोहेल शेख

महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या माणकिवली गावातील ओमकार विश्वनाथ पवार ह्या युवकाने कडाव माणकिवली ह्या रस्त्यावर वाढलेली जंगली झाडे झुडपे सहकार्यांच्या मदतीने काढुन टाकल्यामुळे गावातील आबालवृद्ध ओमकार पवार व त्याच्या सर्व सहकार्यांचे कौतुक करत आहेत. पावसामुळे कडाव माणकिवली ह्या रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात जंगली झाडे झुडपे वाढल्याने ती रस्त्यावर येऊन गावातील नागरिकांना, लहान मुलांना तसेच वयोवृद्धांना येता जाता त्रासदायक व भीतीदायक वाटत होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील वाढलेल्या जंगली झाडाझुडपांतुन विषारी साप रस्त्यावर येत होते, त्यामुळे गावातील नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या ओमकार विश्वनाथ पवार ह्या तरूणाने स्वखर्चातुन आपले सहकारी गणेश ओंबासे, राहुल गंगावणे व प्रफुल गंगावणे ह्यांच्या सहकार्याने‌ कडाव माणकिवली ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस वाढलेली जंगली झाडे झुडपे व वाढलेले गवत काढुन टाकल्यामुळे मुख्य रस्ता पुर्ववत झाल्यामुळे रस्याने जणु मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसुन येत आहे. ओमकार पवार ह्यांच्या सहकार्याने गणेश ओंबासे, राहुल गंगावणे, प्रफुल गंगावणे ह्या तरुणांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली जंगली झाडे झुडपे व गवत नष्ट केल्याने गावातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले.

No comments:

Post a Comment