भाजप माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या लढ्याला यश - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, September 19, 2020

भाजप माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या लढ्याला यश

 भाजप माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या लढ्याला यश

कापसाळ खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनधारकांनी व्यक्त केले समाधान

ओंकार रेळेकर-चिपळूण महामार्ग चौपदरीकरण सुरू असताना मूळ रस्त्याची काही ठिकाणी दुरवस्था  झाली आहे.अशाचप्रकारे दुरावस्था शहरानजिक असणाऱ्या कापसाळ गावातील  ग्रामपंचायात क्षेत्रातील गोसावी बाबा स्टॉप ते मोरेवाडी ,गोरीवलेवाडी या  महामार्गावरील रस्त्याची झाली होती.दररोज याठिकाणाहून शेकडो वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.याठिकाणी अनेकवेळा अपघात होऊन दुर्घटना देखील घडल्या आहेत.या गैरसोयीबाबत काही राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता

                 कापसाळ येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी यांनी वारंवार पाठपुरावा केला असताना आज  खड्डेमय रस्ता पूर्णपणे डांबर खडी टाकुन चांगला करण्यात आला स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे, आहेत.काही दिवसांपूर्वी येथील  तात्पुरते खड्डे भरण्यात आले होते.मात्र पुन्हा काही दिवसातच याठिकाणी खड्डे तयार झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.येथील ठेकेदारानेही या कामी चांगले सहकार्य केले आहे,

त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी सतीश मोरे,आणि येथील लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत,

No comments:

Post a Comment