दापोली तालुक्यातील आंजर्ले गावासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचा आंजर्ले येथे शुभारंभ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

दापोली तालुक्यातील आंजर्ले गावासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचा आंजर्ले येथे शुभारंभ

 दापोली तालुक्यातील आंजर्ले गावासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचा आंजर्ले येथे शुभारंभ


ओंकार रेळेकर-चिपळूणदापोली मतदारसंघाचे तरुण लोकप्रिय आमदार योगेश कदम आमदार होण्यापूर्वी पासून सन्माननीय आ. रामदासभाई कदम साहेब यांच्या माध्यमातून या योजनेसाठी प्रयत्न करत होते, ३ वर्ष  अथक पाठपुरावा करून, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन अखेर या कामाला मंजुरी मिळून ८१ लक्ष रुपये निधी देण्यात आला होता. सदरील कामाची वर्क ऑर्डर ही निघाली होती परंतु कोरोना व निसर्गचक्री वादळामुळे प्रत्यक्ष स्वरूपात कामाला सुरुवात होत नव्हती. प्रत्यक्ष कामासाठी लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी आमदार साहेबांनी पुन्हा बैठका व पाठपुरावा केला. व या अथक मेहेनातीला अखेर यश आले निसर्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या अनेक पाण्याच्या समस्या दूर होणार असून ८१ लाखाच्या या योजनेमुळे आंजर्ले येथील जनतेची पाण्यासाठीची अनेक वर्षांची तहान भागवली जाईल.या आंजर्ले गाव हिताच्या योजना शुभारंभ प्रसंगी माजी जि. प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी जिल्हाप्रमुख  शशिकांत चव्हाण, माजी जि. प. बांधकाम सभापती  चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, दापोली शिवसेना तालुकाप्रमुख  प्रदिप सुर्वे, दापोली शिवसेना तालुका संघटक श्री. उन्मेश राजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. निलेश शेठ, जि. प. सदस्या सौ. रेश्माताई झगडे, सुनिल दळवी, शिवसेना शाखाप्रमुख  चेतन सुर्वे, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment