माथेरानचे सौंदर्य जपायलाच हवं!!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

माथेरानचे सौंदर्य जपायलाच हवं!!!

 माथेरानचे सौंदर्य जपायलाच हवं!!!


चंद्रकांत सुतार--माथेरानमाथेरानमध्ये तीनही  ऋतूंचे वैशिष्ट्य आहे.समाधानकारक पाऊस,थंडीमध्ये  गारवा  एप्रिल ते जून मध्ये गरमी  त्यामुळे अनेक वन्यजीव, वनस्पती,  समृद्ध होतात,  परंतु बऱ्याच ठिकाणी सिमेंट घरे,इतर कामे, आणि मागील काही वर्षात विदेशी वृक्षारोपण , त्याचे जोपासना  यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत गेला,  अनेक ठिकाणी अनेक वेळा  विकासाच्या नावाखाली  निसर्गाला डिवचले गेले, जंगल वन्य जीव याचे जपणूक  करण्याऐवजी  त्यांच्यावर घाला घालण्यात धन्य मानले, जंगलातील अनेक  वन्यजीव, सरपटणारे प्राणी, प्रजाती पशूपक्षी, वनस्पती जंगले, ह्याचा सहयाद्रीच्या डोंगररांगामंध्ये  खजाना होता, आहे , पण ती विविधता आता लोप पावत चालली आहे, आपण मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे स्वतःच्या फायद्यासाठी, विकासाच्या नावाखाली हे निसर्ग भक्ष्यस्थानी पडले आहे.    वातावरणाशी जुळवून घेतलेल्या  जुने, झाडांची जागा आता झटपट वाढणाऱ्या विदेशी झाडांनी घेतली आहे, त्याचा परिणाम  वन्य  जीव व  जंगल नष्ट होत चालले आहे, पर्यावरण ढासळत चालले आहे, माथेरान, व आजूबाजूच्या परिसरात  दरवर्षी  मोठ्या प्रमाणात झाडे तोड,,  वणवा लागणे,  वादळात झाडे उन्मळून पडणे अशा  वेळी  येथील अनेक  वन्य जीव  शेकरू, कालिंदर, खवल्या मांजर,सालींदर भेकर, माकड, वानर, रानडुक्कर,  घोरपड, हे पशु पक्षी शिकार वा अपघाती  बळी पडतात. खवल्या मांजर, सालींदर तर माथेरान मधून नामशेषच  झाले आहेत,बुलबुल, सुतार पक्षी,  वटवाघूळ, मैना, गोगी  छोटे विविध  रंगातील पक्षी, असे अनेक पक्षी यातून वाचू शकले नाहीत , येथे अनेक जातीचे फुलपाखरे,  सरपटणारे प्राणी, सर्प, अंधश्रद्धा, भीती व शिकार यामुळे  नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, वन आणि वन्य जीवांचे संवर्धनासाठी आता पुढे येण्याची गरज आहे, वन , जंगला मधून जाणारे रस्ते अनेक प्रकल्प, विकास योजना, मानवी अतिक्रमणाचा विळखा  यामुळे अनेक वनऔषधी  झाडे झुडपे  नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत,गुलमोहर, बाभूळ, निलगिरी, सुभाबळ  अशी विदेशी झाडे, व येथील मातीत मिसळणारी घोड्याची लिद, सर्वत्र होणारे सिमेंटी करणं, ड्रेनेज पाणी, प्लस्टिक कचरा, यामुळे

पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याने हवेतील प्रदूषण, यामुळे अनेक पशुपक्षी  वन्यजीवानी स्थलांतर केले आहे,सर्वाना उपयोगी व वनौषधी येथील  पर्यावरण  समतोल राखेल अशा वृक्षांची लागवड व संवर्धन न झाल्यामुळे पर्यावरण ढासळत गेले .वड, लिंबू, आंबा, करंज, बेल, साग, बाभूळ या वृक्षाची लागवड करणे  काळाची गरज आहे. ठीकठिकाणी  छोट्या गटाराचे आता मोठमोठाले ओहळ झाल्याने आजूबाजूच्या सर्वच झाडे, माती, याना धोका निर्माण झाला आहे , भविष्यात स्थानिक पातळीवर नियोजन करून अशा ओव्हळ झाल्या ठिकाणी  नैसर्गिकरित्या उपाययोजना केल्यास वटवृक्षांची लागवड , संगोपन केल्यास ह्याचा फायदा  जनावरांना चारा, पशु पक्षांना आश्रय, फळे  असा सर्वानाच होणार आहे. येणाऱ्या काळात, जंगलातील वन्यजीव, पक्षांचा किलबिलाट, फुलपाखरांचे बागडणे,  भेकर डुक्कर ,शेकरू, मुंगूस, घोरपड  सरपटणारे सर्प धामण, हरणटोळ, अजून कित्येक वन्य जीवांचे मुक्त पणे वावरणे पहायचे असेल  तर आपल्या  निसर्गरम्य माथेरानचे सौदर्य, टिकविण्याचे जबाबदारी आपण  घेतलीच पाहिजे

No comments:

Post a Comment