श्रीमंत छत्रपती सौ चंद्रलेखाराजे भोसले यांचे दुःखद निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

श्रीमंत छत्रपती सौ चंद्रलेखाराजे भोसले यांचे दुःखद निधन

  श्रीमंत छत्रपती सौ चंद्रलेखाराजे भोसले यांचे दुःखद निधन

प्रतीक मिसाळ-सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वशंज सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी आणि खा. श्रीमंत छ उदयनराजे भोसले आ. श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या काकी श्रीमंत छत्रपती सौ चंद्रलेखाराजे भोसले यांचे दुःखद निधन झाले.त्या77 वर्षाच्या होत्या.अत्यंत मनमिळावू सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या राजघराण्यातील असून सामान्य लोकांशी सामान्यपणेच वागणाऱ्या असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते . अदालत वाडा येथे त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून सायंकाळी त्यांच्यावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . त्यांना एक कन्या वृषाली या असून त्या त्यांची अनेक वर्ष सुश्रुषा करीत होत्या.


No comments:

Post a Comment