शहापूर मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट सुनील गोगटेनी ठोठावला अभियंत्यांचा दरवाजा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2020

शहापूर मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट सुनील गोगटेनी ठोठावला अभियंत्यांचा दरवाजा

 शहापूर मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट,

सुनील गोगटेनी ठोठावला अभियंत्यांचा दरवाजा

नरेश कोळंबे -कर्जत   कर्जत तालुक्यातील शहापूर मुरबाड 578 ह्या रस्त्याचे नूतनीकरणासाठी नितीन गडकरी यांनी मान्यता देत तब्बल 681 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून दिली होती परंतु कर्जत तालुक्यात ह्या रस्त्याचे काम चालू असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे , याबाबत तक्रार सुनील गोगटे यांनी विभागीय अभियंता यांच्याकडे केली आहे.

   


  

कर्जत ते शहापूर मुरबाड या रस्त्याचे काम मागील वर्षांपासून वेगाने सुरू आहे काही ठिकाणी रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे . परंतु खोपोली हून कर्जत कडे येताना पळसदरी फाट्यापासून कर्जत या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडले असून , मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडले आहेत. राज कॉटेज कर्जत येथे पाणी जाण्यासाठी टाकलेले पाईप थेट हॉटेल व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोडले असल्याने त्याचे कोणतेही नियोजन सदर अभियंत्यांनी केले नसल्याचे समजते. तसेच राज कॉटेज समोरील रस्ता हा योग्य मोजमाप न करता बांधल्याने त्याला अचूक सपाटी न आल्याने व रस्ता वळणाचा बनलेला असल्याने अनेक दुचाकीस्वारांना पाताळ दर्शन झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून आजतागायत कोणाही दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला नाही. परंतु काम व्यवस्थित न झाल्यास मोठा अपघात होऊन एखाद्याला आपला जीव गमवावा लागेल. रस्ते बरेच ठिकाणी उखडले असल्याने या रस्त्यांना असेच ठेवण्यामागे कोणाचा हात तर नाही न ? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातो आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा रस्ते विकास महामंडळ व ठेकेदार यांना सांगितले असूनही ते कोणतीही कारवाई करत नाहीत. याउलट सदर रस्ता पुन्हा उखडून नवीन बनविणार असल्याची दर्पोक्ती करत आहेत. खोपोलीहून कर्जत चारफाटा पर्यंत ह्या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले असल्याने या रस्त्याची तक्रार भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुनील गोगटे यांनी विभागीय अभियंता यांच्याकडे केली असून ज्या लोकांच्या शेतामधून रस्ता गेला आहे व त्यांना आजतागायत कोणतीही भरपाई मिळाली नाही त्यांना भरपाई मिळावी ही आग्रही मागणी केली आहे  . या रस्त्याच्या कामास लवकर सुरुवात न झाल्यास कर्जत भाजप तर्फे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा करत स्थानिक अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला.


No comments:

Post a Comment