कर्जत येथील 'रक्षा समाजिक विकास मंडळाचा' पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

कर्जत येथील 'रक्षा समाजिक विकास मंडळाचा' पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 कर्जत येथील 'रक्षा समाजिक विकास मंडळाचा' पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

दिनेश हरपुडे/ज्ञानेश्वर बागडे

महाराष्ट्र मिरर टीम कर्जत24 ऑगस्ट 2020 रोजी तारिक गार्डन, काजल पुरा, महाड, जिल्हा रायगड. येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वेळेस, भारतीय नागरिकाची सामाजिक व भावनिक जबाबदारी ओळखून, कर्जत येथील आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा क्षेत्रात कार्य करणारे, 'रक्षा सामाजिक विकास मंडळाचे' 5 जवान तातडीने शोध व बचाव कार्यासाठी कर्जत वरून महाडला रवाना झाले होते. याबद्दल कर्जत तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी या दुर्घटनेबद्दल वरील संस्थेला माहिती दिली व तातडीने महाडकडे रवाना होण्यास सांगितले. दरम्यान हा प्रवास चालू असताना कर्जत तालुक्याचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी अमित गुरव यांना, महाडचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक देऊन त्यांच्या संपर्कात राहायला सांगितले.

        महाड येथील दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी घटना होती, या इमारतीचे पूर्णपणे 5 मजले जागच्याजागी बसले होते. 24 ऑगस्ट च्या मध्यरात्री, रक्षा सामाजिक विकास मंडळाचे ज्येष्ठ गिर्यारोहक, अमित हरि गुरव यांच्या नेतृत्वाखाली शोध आणि बचाव कार्याची टीम महाडमध्ये पोहोचली आणि रात्री तूनच त्यांनी शोध व बचाव कार्याला सुरुवात केली. या शोध आणि बचाव पथकामध्ये कर्जत येथील अक्षय गुप्ता, प्रखर गुप्ता, प्रसाद गिरी व सुमित गुरव यांचा समावेश होता. महाड इमारत दुर्घटना बचाव कार्याबद्दल बोलताना, श्री गुरव यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले की, त्या घटनास्थळी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस, बचाव पथके, सामाजिक कार्यकर्ते, जेसीबी, पोकलेन व डंपर पोहोचले होते. काही कालावधीनंतर त्यांनी अपघात ग्रस्त ठरलेल्या बिल्डिंगचा मलबा बाहेर काढण्यासाठी जेसीबी व पोकलेन यांना मदत कार्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी जेसीबी/ पोकलेन ड्रायव्हर यांना मार्गदर्शन करणे योग्य त्या ठिकाणी खणण्यासाठी दिशा दाखवणे, जेसीबी द्वारे खणत असताना, समोरच्या मलब्या मध्ये तेथे राहणारे व्यक्तींचे काही मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, दागदागिने आढळल्यास प्रशासनाच्या हवाली करणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे शोधकार्य करत असताना, वेळोवेळी जेसीबी व पोकलेन चे कार्य थांबून मलब्या मधील मोकळ्या जागे मध्ये आवाज देऊन, कोणी इमारतीमध्ये अडकलेली व्यक्ती प्रतिसाद देतोय का? हे बघत राहणे, इत्यादी महत्वाचे कार्य ते करत होते. या सर्व बचाव पथकांना व NDRF च्या टीमला जवळजवळ 18 तासानंतर म्हणजे 25 ऑगस्टला फार मोठे यश मिळाले, ते म्हणजे एक लहान मुलगा व काही कालावधीनंतर 62 वर्षाच्या महिला यांना जिवंत बाहेर काढण्यात आले. कित्येक तास, दिवस-रात्र निस्वार्थीपणे बचाव कार्य, या सर्व बचत पथकांत तर्फे करण्यात येत होते.
           या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक अनुकूल गोष्ट अशी होती की, पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे जेसीबी, पोकलेन आणि इतर गोष्टींच्या साह्याने शोध आणि बचाव कार्याला उत्तम वेग मिळत होता. हे शोधकार्य दिवस रात्र चालू असताना रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री शितोळे हे जातीने दोन दिवस दुर्घटना स्थळी हजर होते. त्याच बरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी घटनास्थळी उपस्थित होत्या. 

सर्व जगभरामध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूची परिस्थिती असून, जेथे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते अशा परिस्थितीत, अगदी निस्वार्थ भावनेने आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना सहकार्य करण्यास आलेल्या सर्व बचाव पथकांचा सन्मान, प्रशस्तीपत्र देऊन अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. हा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडला. राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते, रक्षा सामाजिक विकास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून, श्री अमित गुरव, सुमित गुरव यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, अपर जिल्हाधिकारी, महाड तालुक्याचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment