सातारा शहर नगर पालिकेच्या हद्दवाढीस नागरिकांचा विरोध - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

सातारा शहर नगर पालिकेच्या हद्दवाढीस नागरिकांचा विरोध

 

सातारा शहर नगर पालिकेच्या हद्दवाढीस नागरिकांचा विरोध

प्रतीक मिसाळ -सातारासातारा शहर नगर पालिकेच्या अनाहूत हद्दवाढ प्रकरणी शहर परिसरातील नागरीकांमध्ये तीव्र संतापाच्या व विरोधाच्या भावना उमटत आहेत . शहर परिसर सुधार समिती व शहर सुधार समिती सातारा यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या सर्व सकारात्मक जनहिताच्या धोरणास पाठिंबा असून शहर परिसराच्या विकासासाठी नवशहर विकास प्राधिकरण न्यू टाऊन डेवलपमेंट अॅथोरिटी प्रस्तावाद्वारे न्यू सातारा सिटी विकसीत करण्याची मागणी मा जिल्हाधिकारी सातारा यांच्याद्वारे राज्य शासनाकडे केली आहे . या भुमिकेची माहिती देणारा फलक शाहूनगर परिसरातील राजर्षि शाहू चौकात लावण्यात आला त्यावेळी शहर परिसर सुधार समितीचे का विजय निकम , प्रा . डी . बी . जाधव , डा जाधव , सचिन मोरे , उदय चव्हाण , श्रीमती शुभदा राने , अंकुश शिवंकर , प्रा . ढाणे , गोपाळ क्षिरसागर , बाळासाहेब गुरव , सुर्यवंशी आदि शाहूनगरवासी नागरिकांनी समर्थन दिले . याविषयी मा . उपमुख्यमंत्री यांच्या नावे हद्दवाढीची बातमी जी प्रसिध्द झाली त्यांच्यासहीत मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे महाविकास आघाडी संयोजक मा . शरद पवार साहेब यांची भेट घेण्याबद्दल निश्चित करण्यात आले आहे . त्याचप्रमाणे शाश्वत नागरिकरणाचा व सुनियोजीत नागरी विकास अधिकारासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे . असे शहर परिसर सुधार समितीने सुचित केले आहे . येत्या मंगळवारी दि . 15 सप्टेंबर 2020 रोजी शहर परिसर न्यू सातारा सिटी मागणीसाठी मा . जिल्हाधिकारी सातारा यांच्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . या भुमिकेस शहर सुधार समिती साताराच्या वतीने अस्लम तडसरकर प्रा . विक्रांत पवार उमेश खंडुझोडे , प्राचार्य शिवाजी राऊत यांनी पाठींबा दिला आहे.


No comments:

Post a Comment