Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गवळी समाजाचा बुलंद आवाज जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कांबळे यांचे निधन

गवळी समाजाचा बुलंद आवाज जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कांबळे यांचे निधन

ओंकार रेळेकर-चिपळूण

गवळी समाजाचा बुलंद आवाज धडाडीचे कार्यकर्ते महाराष्ट्र यादव चॅरिटीट्रस्ट चे विश्वस्त श्री कृष्णा कांबळे यांचे आज रविवारी सकाळी ९ वा च्या सुमारास निधन झाले , कोरोना आजाराशी त्यांची लढाई अपयशी ठरली अखेर उपचार सुरू असतांनाच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला,*सामान्य* कुटुंबात जन्माला आलेले स्वर्गीय कृष्णा कांबळे हे जरी उच्च शिक्षित नसले तरी सुंदर वक्तृत्व,उत्तम कर्तृत्व आणि कुशल नेतृत्व यामुळे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय ठरले आणि त्यामुळेच त्यांची मुंबई शाखेच्या चिटणीस

पदी निवड करण्यात आली होती.अत्यंत परिश्रम ,चिकाटी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये

निर्माण केलेली आपुलकी व त्यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक

संबंध यामुळेच ते यशस्वी ठरले आणि त्यांच्याच यशस्वी कारकिर्दीत शाखेच्या

भव्यदिव्य डौलदार अशा समाजमंदिराची देवरुख सारख्या तालुक्याच्या मुख्यठिकाणी उभारणी झाली.त्याचप्रमाणे गेली १० वर्षे यादव समाज नागरी

सहकारी पतपेढीचे ते अध्यक्ष होते.हाती घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये स्वताला झोकून देणे आणि कार्यकर्ते व सभासद यांना विश्वासात घेऊन निस्वार्थीपणे ते

काम पूर्णत्वास नेणे या त्यांच्यातील आदर्श गुणांमुळेच आज पतपेढी स्वनिधीवर

समर्थपणे यशस्वीरीत्या उभी आहे. प्रतिमाशील कौशल्य,स्वच्छ प्रतिमा आणि लोकसंग्रहांचा अनमोल ठेवा जपणाऱ्या

या सामान्य कार्यकर्त्यांची म.या.चॅ.ट्रस्ट च्या सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे

संगमेश्वरमधील मुंबई आणि ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना खूप आनंद व्यक्त केला होता तालुक्यातील तमाम गवळी बांधव यांना सार्थ अभिमान वाटेल असे त्यांचे समाजकार्य होते,

गवळी समाजाने हक्काचा  नेता गमावला : चंद्रकांत भोजने

*संगमेश्वर तालुक्यातील गवळी समाजाचे लोकप्रिय जेष्ठ नेते, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट ,संगमेश्वर तालुका शाखेचे मुंबईचे यशस्वी चिटणीस ज्यांनी तालुका शाखेला शिखरावर नेऊन ठेवले,तसेच यादव समाज नागरी सहकारी पतपेढीचे संस्थापक कार्यकर्ते,पतपेढीचे दहा वर्षे अध्यक्षपद सांभाळून पतपेढीचा उत्कर्ष घडवून आणणारे विद्यमान संचालक, स्वतःच्या श्री महावीर नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेला (डोंबिवली) महाराष्ट्र शासनाचे, सहकार भूषण व सहकार

निष्ठ हे सन्मानाचे दोन पुरस्कार मा. मुख्यमंत्री व मा.राज्यपाल यांच्या हस्ते प्राप्त करून महाराष्ट्रातील आदर्श गृहनिर्माण संस्था म्हणून लौकिक मिळवून देणारे, विविध सामाजिक संघटनाशी बांधिलकी असणारे  कृष्णा कांबळे साहेब यांच्या निधनाने गवळी समजाने चांगला हक्काचा नेता गमावला असल्याची खंत चंद्रकांत भोजने यांनी व्यक्त केली आहे,

कृष्णा कांबळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आहेत,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies