चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 8, 2020

चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

 चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा


ओंकार रेळेकर-चिपळूणयेथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस पतसंस्थेच्या सहकार वैभव सभागृहात घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे कर्मचारी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.


चिपळूण नागरी पतसंस्थेची २५ वर्षापुर्वी चिपळुणात स्थापना झाल्यानंतर कोकणात सहकार रुजविण्यात सुभाषराव चव्हाण यांनी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पतसंस्थेच्या शाखा उभ्या केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक ताकद देण्याचे काम या संस्थेने केले आहे. कोरोनासारख्या काळात देखील अनेकांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी देणारी राज्यातील ही एकमेव ठरली आहे. कोरोनामुळे यावर्षी श्री. चव्हाण यांचा वाढदिवस सोहळा रद्द करण्यात आला. दरवर्षी या निमित्ताने सोहळा व सहकार विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु, यावर्षी साधेपणाने हा कार्यक्रम झाला. संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांनी औक्षण करुन सुभाषराव चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या तर कर्मचाऱ्यां वतीने वाढदिवस साजरा झाला. यावेळी चव्हाण यांनी केक कापला. कार्यक्रमाला पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी   स्वप्ना यादव, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, संचालक अशोक साबळे,  खेतले, अन्य संचालक व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment