निमणी येथे ग्रामपंचायती मार्फत स्वच्छ जल योजनेचे उद्घाटन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

निमणी येथे ग्रामपंचायती मार्फत स्वच्छ जल योजनेचे उद्घाटन

 निमणी येथे ग्रामपंचायती मार्फत स्वच्छ जल योजनेचे उद्घाटन 

सुधीर पाटील-सांगलीयेळावी प्रादेशिक योजना बंद झाले पासून निमणी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता .ही अडचण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने १४ वा वित्त आयोगातील निधी मधून कामबदल प्रस्ताव सादर करून सी.ओं च्या मंजूरी नंतर ताशी १००० ली. क्षमतेचा आर.ओ. प्लाँट उभारला असून त्याचे उद्‌घाटन रविवारी ज्येष्ठ नेते बबनकाका पाटील, महादेव बापू लुगडे,पोलीस पाटील सतीश पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील , सरपंच विजय पाटील व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते करणेत आला.या प्लाँटमधून लोकांना अतिशय माफक दरात म्हणजे ३ रुपयांस २०लीटर पाणी देण्याचा निर्णय सरपंच विजय पाटील व सर्व ग्रा.प.सदस्यांनी घेतला असून प्रत्येक कुटुंबास १५० रू.चे रिचार्ज A.T. M कार्ड दिले जाणार असून त्याद्वारे पाणी मिळण्याची सोय होणार आहे. याचे सर्व ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment