शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर लाक्षणिक आमरण उपोषणाला बसू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर लाक्षणिक आमरण उपोषणाला बसू

 शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर लाक्षणिक आमरण उपोषणाला बसू

रिलायन्स इथेन गँस प्रकल्पग्रस्त शेतक-यांचा इशारा


 महाराष्ट्र मिरर टीम --कर्जत 19 आँगस्ट रोजी अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, नसरापूर, कडाव येथील शेतक-यांनी संघटीत होऊन कर्जत तहसिल कार्यालय आवारात रिलायन्स इथेन गँस प्रकल्पात अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला आणि मागण्यांसाठी साखळी उपोषण केले होते. त्यावेळी शेतक-यांनी उपोषण स्थगित करावे म्हणून तहसिलदार विक्रम देशमुख यांनी विनंती केली व याविषयासंदर्भात सक्षम प्राधिकारी यांस पत्रव्यवहार करून शेतक-यांच्या मागण्यावर त्वरीत कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. आज जवळपास महिना होत आला पंरतू कोणत्याही प्रकारची माहिती अथवा बोलावणे शेतक-यांना कंपनी अथवा भुसंपादन विभागाकडून आले नाही म्हणून आज प्रकल्पग्रस शेतक-यांनी तहसिलदार विक्रम देशमुख यांची केशव तरे, उमेश राणे, कृष्णा शिंगे, रोहित राणे, रघुनाथ तरे, प्रशांत बैलमारे  या प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी भेट घेऊन त्यांनी शेतक-यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली तसेच जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुन्हा लाक्षणिक आमरण उपोषणाला बसण्याचाही इशारा दिला.


शेतकरी आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षापासून सक्षम प्राधिकारी, रिलायन्स प्रकल्प अधिकारी तसेच शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. दलालांमार्फत शेतक-यांची फसवणूक करण्यात आली असून खोटे पंचनामे करून मुळ शेतक-याला मोबदला न देता डमी व्यक्ति उभी करून पंचनामे केल्याची प्रकरणी समोर आली आहेत. तसेच पाइपलाईन टाकण्यासाठी कंपनी प्रशासनाकडून पोलिसी बळाचाही वापर करत शेतक-यांना धमकावून जमिनी बळकावल्या. आज जमिनी नापिक झाल्या, जमिनीची बांध बंदिस्ती न झाल्याने शेतजमिनी ओसाड झाल्या. त्यामुळे शेतक-यांचे झालेले हे दुहेरी नुकसान असून जर त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही तर वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यावाचून पर्याय नाही असा निर्वाणीचा इशारा आज शेतक-यांनी दिला आहे.


गेल्या २ महिन्यांपासून प्रकल्पग्रस्त शेतक-यांचा हा लढा राजेश भगत यांनी भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार लढत असून लवकरच शेकतरी विरोधी पक्षनेते श्री.प्रविण दरेकर यांची भेट घेणार आहेत.

No comments:

Post a Comment