अबब!!!चार एकरवरील कोथिंबीर विकली साडेबारा लाखाला! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 8, 2020

अबब!!!चार एकरवरील कोथिंबीर विकली साडेबारा लाखाला!

 अबब!!!चार एकरवरील कोथिंबीर विकली साडेबारा लाखाला!

महाराष्ट्र मिरर टीम -नासिकनासिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील एका शेतकऱ्याने चार एकरवर कोथिंबीर पेरली आणि त्या कोथिंबीरचा व्यवहार तब्बल साडेबारा गेल्याने या शेतकऱ्याविषयी परिसरात कुतूहल निर्माण झाल आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा नगदी पिकाकडे वळावे अस बोललं जातंय.

नांदूर शिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांनी त्यांच्या चार एकर शेतीत कोथिंबीर पेरली,त्यांना बाजारभाव काय राहील याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. त्यांनी ४५ किलो कोथिंबीर बियाणे ४५ दिवसात तयार केली.विनायक हेमाडे यांच्या कोथिंबीरला विक्रमी बाजारभाव देत शिवाजी दराडे या व्यापाऱ्याने ही कोथिंबीर खरेदी केली. या खरेदीचा व्यवहार तब्बल १२लाख ५१हजार रुपयांना झाला.शेतकऱ्याच्या  शेतीमालाला हा विक्रमी भाव मिळाल्याने परिसरात कुतुहलाचा विषय बनला आहे.महाराष्ट्रभर विनायक हेमाडे यांच्या नावाची चर्चा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा नगदी पिकाकडे वळावे अस बोललं जातंय.


No comments:

Post a Comment