सकल मराठा समाज चिपळूणच्या वतीने १६ रोजी सरकारच्या निषेधाचे प्रांताना देणार निवेदन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

सकल मराठा समाज चिपळूणच्या वतीने १६ रोजी सरकारच्या निषेधाचे प्रांताना देणार निवेदन

            मराठा आरक्षणाला स्थगिती

सकल मराठा समाज चिपळूणच्या वतीने १६ रोजी सरकारच्या निषेधाचे प्रांताना देणार निवेदन


ओंकार रेळेकर-चिपळूण
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर आणलेली स्थगिती हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या जिल्हानिहाय बैठका होत आहेत. याच  अनुषंगाने सकल मराठा समाज चिपळूण तालुक्याची नुकतीच प्राथमिक बैठक हॉटेल अतिथी येथे  झाली.  या बैठकीमध्ये नुकत्याच झालेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून सरकारच्या निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी चिपळूण यांचेकडे देण्यासाठी बुधवारी  जाण्याचे ठरले. 


याकरिता बुधवार दिनांक १६ रोजी सकाळी १०.३० वाजता जास्तीत जास्त संख्येने हॉटेल अतिथी येथे उपस्थित रहावे असे आवाहन करणेत आले आहे.


यावेळी  प्रकाश देशमुख, अजित साळवी, सतिश मोरे, सुबोध सावंत देसाई, सतिश कदम, रणजित डांगे, संतोष सावंतदेसाई,  मकरंद जाधव, राज खेतले, सचिन नलावडे,  राजेश कदम, सुनिल चव्हाण,  शैलेश शिंदे, सुरज कदम, विक्रम सावंत, श्री जाधव, श्री. पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment