Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीवर्धनमध्ये "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मिशन सुरू ,

 श्रीवर्धनमध्ये "माझे कुटुंब  माझी जबाबदारी" मिशन  सुरू ,

जनतेचे सहकार्य महत्वाचे - पालकमंत्री अदिती तटकरे

 विजय गिरी-श्रीवर्धन

शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात श्रीवर्धन तालुक्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाली .या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या कि ,श्रीवर्धन तालुक्यात माझे कुटुंब  माझी जबाबदारी मिशन  सुरू झाले असून जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे ,मोहिमेत श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक तपासणीसाठी श्रीवर्धनमध्ये ९२ पथके तैनात करण्यात आले आहेत .ही पथके दिवसातून दोन वेळा घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत .प्रत्येक पथक किमान 50 कुटुंबांची तपासणी घेऊन आरोग्य विषयक माहिती संकलित करणार आहे .पालकमंत्र्या समवेत प्रांताधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी ,मुख्याधिकारी किरण मोरे ,गटविकास अधिकारी भोगे ,नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे संवाद साधताना अदितीताई म्हणाल्या की ,महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने योजलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मिशनचे १२ सप्टेंबर रोजी परिपत्रक निघाले असून श्रीवर्धन नगरपरिषद तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून अमलबजावणी करण्यात आली असून आज पासून श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील विविध गावात तपासणीसाठी यंत्रणा सुरू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावात घरो घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोणाला आजार आहेत का? त्याच बरोबर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजनची व शारीरिक तापमानाची मात्र तपासली जाणार आहे. व याची संपूर्ण माहिती शासनाच्या अँप मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. 

         

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील कोविड झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक शिक्षक, एक अंगणवाडी सेविका, एक आशा वर्कर अशी तिघांच पथक असे ९२ पथक तैनात करण्यात आले आहेत. एक पथक एक दिवसाला ५० कुटूंबाच्या तपासणी करणार असल्याचे सांगितले .


हि मोहीम १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२०  या कालावधीमध्ये घेण्यात येणार असून घरातील सर्व सदस्यांचे तापमान, दमा, ताप, खोकला, कोवीडसदृष्य लक्षणे असणा-या  व्यक्तीना जवळच्या रूग्णलयामध्ये उपचार घेण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.मोहिमेची सांगता २५ ऑक्टोबर २०२०  रोजी होणार असून,  पहिली फेरी १५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२०  आणि दुसरी फेरी १४ ऑक्टोबर २०२० ते  २४ ऑक्टोबर २०२०   या कालावधीत घेण्यात येणार असुन पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवस व दुस-या फेरीचा काळावधी १०  दिवसांचा असल्याचे सांगितले. 

मोहिमेत अदितीताईनी स्वतः पथकात सहभागी होऊन नागरिकांनां तापमान व ऑक्सिजन तपासून विचारपूस केली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies