कराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

कराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार


.......कठीण प्रसंगात माणसातल्या देवाचे घडले दर्शन!!!

कराडच्या मुख्याधिकारी यांनी केले कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार....

कुलदीप मोहिते-कराड

वाईट काळ आला की मनुष्य प्राण्यांची परीक्षा खऱ्या अर्थाने सुरू होते, असे म्हणतात....एवढा काळ लांबून पहायला मिळणारे covid पेशंट आता शेजारी पाजारी आणि स्वतःच्या घरात बघायला मिळत आहेत. .. Covid मुळे आज जिल्ह्यांत एक जण माणूस मृत्य पावला अशी बातमी भूतकाळात जाऊन आपल्या पेठेत किंवा अगदी गल्लीत यायला लागली आहे रोज कोरोनाच्या मृत्यूने थैमान घालणे सुरू झाले आहे....कोरोना निगडित सर्व उपाययोजना यांच्या पुढे शासन आणि सर्वसामान्य लोकं हतबल झाली आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली.......अशावेळी प्रशासन अधिकाऱ्यांनी व प्रमुखाने सर्व सिमा पार करून आपल्या कर्तव्याचा एक वस्तुपाठ समस्त कराडकरांना आज दाखवुन दिला.मधील सोमवार पेठेत आज दुर्दैवाने एक कोरोना पेशंट मृत्यू पावले, सदरच्या व्यक्तीचा मृतदेह सील करून अंतिमविधी करण्यासाठी ऐनवेळी कर्मचारी उपलब्ध न झाल्याने हे काम आता कोणी करायचे? असा प्रश्न प्रशासन आणि नातेवाईक या सगळ्यांच्या समोर उभा राहिला......


माणूस सर्वात जास्त स्वतःच्या मृत्यूला घाबरतो असे म्हटले जाते, पण त्याला अनेक अपवाद असतात जे मृत्यूला न घाबरता धाडस करतात त्यांना वीर पुरुष म्हणतात...... कऱ्हाडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि त्यांचे सहकारी या पठडीतले.... या बहाद्दरांनी स्वतः PPE किट घालून मृत्यू पावलेल्या या कऱ्हाडकर नागरिकाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखवलेले धाडस म्हणजे त्यांच्या आणि त्यांचे सहकारी यांच्या धाडसी वृत्ती आणि कर्तव्य तत्परतेचे ज्वलंत उदाहरण...मृतदेहास संपूर्ण सील करून त्यांच्या अंत्यविधीसाठी दाखवलेले धाडस खरंच कौतुकास्पद आहे,


सध्याच्या काळात असे शेकडो "रमाकांत" उभे रहावेत हीच प्रार्थना, खबरदाऱ्या घेवून समाजाला उपयोगी पडणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांनी "जिथे कमी तिथे आम्ही" असे म्हणून काम करायला हवे. प्रशासनाने देखील समाजातून पुढे येणाऱ्या अशा स्वयंसेवी वृत्तीच्या लोकांना उत्तेजन देवून आणि योग्य दक्षता घेवून सध्याच्या वाईट काळात बरोबर घ्यावे असे वाटते .....रमाकांत डाके यांचे कौतुक आहेच परंतु भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने सर्व प्रकारच्या कामांच्या साठी प्रत्येक स्तरावर यंत्रणेला अजून जास्तीच्या कर्मचारी संख्येची जोड देणे आवश्यक आहे......जे काम सैनिकांचे किंवा स्वयंसेवकाचे ते काम प्रमुख निर्णयकर्त्यांनी अपवादात्मक करणेच ठीक राहिल..... कऱ्हाड ग्रेट आहेच पण कऱ्हाड ला ग्रेट बनवणारे कऱ्हाडकर आणि त्यांना लाभलेले असे मुख्यअधिकारी आपल्या गावाची शान आहेत.....सगळे मिळून एकमेकाला सावरत या काठीणकाळात उभे राहूया, कारण लढाई खूप मोठी आहे....असं कराडकर जनतेच  म्हणणं आहे.No comments:

Post a Comment