Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

राजनीतीज्ञ स्वातंत्र्य सैनिक

 राजनीतीज्ञ स्वातंत्र्य सैनिक

नेहरू कुटुंबात जन्माला येऊनही अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्या गौरवशाली घटनेला आज ६७वर्षे झाली.

संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला.

घरात मोतीलाल नेहरू, जवाहरलालजी यांच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण होतेच. विजयालक्ष्मी या जवाहरलालजींच्या भगिनी. त्याही चळवळीत उतरल्या. पण आंदोलनापेक्षा त्यांचा कल रचनात्मक कामाकडे असल्याने त्या पुढे प्रांतिक सरकारात सामील झाल्या व उत्तर भारतात मंत्रीही बनल्या.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात आल्या. सोविएत युनियन, अमेरिका या देशांत राजदूत म्हणून काम केल्यावर त्या बिरिटनमधील भारताच्या उच्चायुक्त बनल्या. तिथूनच त्यांची संयुक्त राष्ट्रांत नेमणूक झाली.

१९५३मध्ये आंतरराष्ट्रीय स्थिती अशांततेची असताना त्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्ष बनल्या. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आदराने घेतले जाऊ लागले.

भारतात परतल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल (१९६२-६४) म्हणून दोन वर्षे काम पाहिले.

नेहरूंचे १९६४ साली निधन झाल्यावर त्या त्यांच्या फुलपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडूनही आल्या. १९६७पर्यंत त्या खासदार होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगावरही त्यांनी काम केले.

भाची इंदिरा गांधी यांच्याशी पराकोटीचे मतभेद असल्याने सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन त्या डेहराडूनला स्थायिक झाल्या. पण इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केली तेव्हा त्या पुन्हा सक्रिय झाल्या. १९७७च्या लोकसभा निवडणुकांत त्यांनी जनता पार्टीचा पुरस्कार व प्रचार केला.

पुढे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते पण ते मागे पडले. १९९०मध्ये डेहराडूनला त्यांचे निधन झाले. त्यांची कन्या नयनतारा सेहगल या विचारवंत लेखिका असून त्या आजही चर्चेत असतात.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय महिलेची ध्वजा ज्यांनी फडकवली, त्यांत विजयालक्ष्मी पंडित यांचा समावेश होतो. त्यांचे पती रणजीत सीताराम पंडित हे मराठी भाषक बॅरिस्टर होते, ही बाब मराठी मनाला सुखावणारी आहे.

 चेअरमन..!

संयुक्त राष्ट्र संघ ही सर्वोच्च जागतिक संघटना! तिच्या आमसभेच्या अध्यक्षपदी बसण्याचा सन्मान मिळवणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित या केवळ भारतीय नव्हेत तर महाराष्ट्राच्या सुनबीई!

नेहरू कुटुंबात जन्माला येऊनही अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्या गौरवशाली घटनेला आज ६७ वर्षे झाली.

संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला.

घरात मोतीलाल नेहरू, जवाहरलालजी यांच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण होतेच. विजयालक्ष्मी या जवाहरलालजींच्या भगिनी. त्याही चळवळीत उतरल्या. पण आंदोलनापेक्षा त्यांचा कल रचनात्मक कामाकडे असल्याने त्या पुढे प्रांतिक सरकारात सामील झाल्या व उत्तर भारतात मंत्रीही बनल्या.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात आल्या. सोविएत युनियन, अमेरिका या देशांत राजदूत म्हणून काम केल्यावर त्या बिरिटनमधील भारताच्या उच्चायुक्त बनल्या. तिथूनच त्यांची संयुक्त राष्ट्रांत नेमणूक झाली.

१९५३मध्ये आंतरराष्ट्रीय स्थिती अशांततेची असताना त्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्ष बनल्या. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आदराने घेतले जाऊ लागले.

भारतात परतल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल (१९६२-६४) म्हणून दोन वर्षे काम पाहिले.

नेहरूंचे १९६४ साली निधन झाल्यावर त्या त्यांच्या फुलपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडूनही आल्या. १९६७पर्यंत त्या खासदार होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगावरही त्यांनी काम केले.

भाची इंदिरा गांधी यांच्याशी पराकोटीचे मतभेद असल्याने सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन त्या डेहराडूनला स्थायिक झाल्या. पण इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केली तेव्हा त्या पुन्हा सक्रिय झाल्या. १९७७च्या लोकसभा निवडणुकांत त्यांनी जनता पार्टीचा पुरस्कार व प्रचार केला.

पुढे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते पण ते मागे पडले. १९९०मध्ये डेहराडूनला त्यांचे निधन झाले. त्यांची कन्या नयनतारा सेहगल या विचारवंत लेखिका असून त्या आजही चर्चेत असतात.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय महिलेची ध्वजा ज्यांनी फडकवली, त्यांत विजयालक्ष्मी पंडित यांचा समावेश होतो. त्यांचे पती रणजीत सीताराम पंडित हे मराठी भाषक बॅरिस्टर होते, ही बाब मराठी मनाला सुखावणारी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies