.....आणि कालिंदराची सुटका झाली! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

.....आणि कालिंदराची सुटका झाली!

 

......आणि कालिंदराची सुटका झाली!माथेरान घनदाट जंगलाने व्यापले आहेच ह्यात अनेक  वन्यजीव आपले  जीवन शांततेत जगत असतात. कोणासही कसली इजा न करता आपल्या दुनियेत आपल्या परिवारासोबत  आनंदात जगत असतात . बस्स! मानवाने त्याच्याकडे बघण्याचा  दृष्टीकोन बदलला पाहिजे,कारण जंगलातील कोणतेही वन्यजीव जंगलात पाहताना  वेगळीच भावना आणि आनंद असतो . तुम्ही जगा आम्हाला जगु दया  !!! असेच काहीस आज माथेरानमध्ये  कालिंदर मेन रस्त्यावर आपल्या पाच पिल्ला सोबत चुकन  आल्यावर तिचे पिल्लू गटारात गेल्याने त्याला वर येता येत नव्हते त्यामुळे थोडा गोंधळेल्या कालिंदर मातेची घालमेल चालू होता ओरडत होती तीआम्हाला बघुन  घाबरली होती ,आम्ही गटारात काटी उभी केल्याने ते पिल्लू बाहेर येऊन  आपल्या आईकडे गेले,  व आपल्या सर्व पिल्लांना घेऊन ते कलिंदर  माता झुडपात निघुन गेले,  आम्ही मानव आणि  ते जनावर  असले तरी आता आपण केलेली वन्यजिवाची सुटका यातून मिळालेले समाधान आणि त्यातून मिळालेला विश्वास खूप काही सांगून जातो.@चंद्रकांत सुतार-माथेरान


No comments:

Post a Comment