Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

एनयुजे महाराष्ट्रचे सचिन तोडकर यांचा प्लाझ्मा दानाचा 'पॅटर्न' ठरतोय यशस्वी!!



एनयुजे महाराष्ट्रचे सचिन तोडकर यांचा प्लाझ्मा दानाचा 'पॅटर्न' ठरतोय यशस्वी!!



      रायचंद शिंदे-पुणे

     


      

 खरं तर कोरोना काळात प्रत्येक पत्रकार आपल्याला कोरोना बाबत चर्चेची बातमी कशी मिळेल किंवा रोजच्या आकडेवारीत अडकला असताना आमचा एक सहकारी आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट(Nujm) या संघटनेचा सदस्य व  पुण्याच्या आंबेगाव nujm चे तालुका अध्यक्ष पत्रकार सचिन तोडकर यांनी त्यांच्या लोकविश्व प्रतिष्ठान च्या माध्यमातून प्लाझ्मा दान अभियान सुरू केले आहे. आणि समाजापुढे व एकूणच पत्रकारांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे



          या अभियानांतर्गत तोडकर यांनी चार-पाच दिवसातच कोरोनाच्या 06 रुग्णांना प्रत्येक्ष प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून दिला आहे, तर 20 ते 25 रुग्णांना प्लाझ्मा डोनर किंवा प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे. प्लाझ्मा दान अभियान राबविताना तोडकर यांनी विकसीत केलेल्या 'प्लाझ्मा दानाचा सचिन तोडकर पॅटर्न' मुळेच हे अवघड काम सहज शक्य होत असल्याचे तोडकर यांनी सांगितले.

          प्लाझ्मा दान अभियान राबविण्याबरोबरच समाज माध्यमांच्या मदतीने प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती करण्याचे कामही सचिन तोडकर यांनी सुरू केले आहे. त्यासाठी ते रोज प्लाझ्मा थेरपी बाबत सविस्तर माहिती, कोणती व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते, प्लाझ्मा दान करण्यासाठी काय निकष आहेत, कोणत्या रक्त गटाचा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला चालतो याबाबत जनजागृती करणाऱ्या विविध पोस्ट समाज माध्यमांमध्ये करत असतात व त्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.



             काही दिवसांपूर्वी पत्रकार सचिन तोडकर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोना चा प्रादुर्भाव झाला होता. कुटुंबाचे सदस्य कोरोना उपचार केंद्रात अँडमिट असताना तोडकर यांनी कोरोना उपचार केंद्राबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण व गोंधळ अनुभवला. त्यातूनच कोरोना बधितांना व त्यांच्या गोंधळलेल्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय घेताना सचिन तोडकर यांनी प्लाझ्मा दान अभियान सुरू केले.

           सद्य स्थितीमध्ये एखाद्या रुग्णाला प्लाझ्मा लागल्यावर त्या रुग्णाच्या रक्तगटाच्या प्लाझ्माची सगळीकडे शोधाशोध सुरू होते. आशा तातडीच्या शोधाशोध मध्ये त्या रुग्णाच्या रक्तगटाच्या प्लाझ्मा कधी मिळतो तर कधी मिळत नाही व प्लाझ्मा न मिळाल्याने रुग्णाला आपले प्राण गमवावे लागतात.

              या सर्व बाबींचा अभ्यास करून सचिन तोडकर यांनी स्वतःचा 'प्लाझ्मा दानाचा सचिन तोडकर पॅटर्न' विकसित केला असून त्या पॅटर्न नुसार तोडकर हे परिसरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना संपर्क साधतात, त्यांच्यात प्लाझ्मा दानाची जनजागृती करून त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करतात, प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार झालेल्या व्यक्तींची रक्तगटानुसार नोंद करून ठेवतात. व जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा प्लाझ्मा साठी फोन आला तर त्याला नोंदवहीतून त्या रुग्णाच्या रक्तगटाचा प्लाझ्मा डोनर अगदी पाच मिनीटात उपलब्ध करून देतात. 

             प्लाझ्मा दात्यांची रक्त गटानुसार आगाऊ नोंदणी करणे व गरज पडलेल्या रुग्णाला त्या नोंदणी केलेल्या यादीतून तात्काळ प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून देणे हा 'प्लाझ्मा दानाचा सचिन तोडकर पॅटर्न' यशस्वी होत असून इतरांसाठी अनुकरणीय ठरत आहे.

         सचिन तोडकर प्रत्यक्ष गाठी-भेटी व समाज माध्यमातून आवाहन करून प्लाझ्मा दात्यांची नावनोंदणी करत आहेत. प्लाझ्मा दात्यांची नावनोंदणी असल्यामुळे त्यांना गरजू रुग्णांना तात्काळ प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून देता येत आहे. मात्र तोडकर यांच्याकडे नोंदणी नसलेल्या रक्तगटाच्या प्लाझ्माची जर त्यांना मागणी आली तर ते संबंधित पेशंटच्या नातेवाईकांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन व सहकार्य करतात. त्यात मग तोडकर त्या रुग्णाच्या नातेवाईकांना पुण्यातील महत्वाच्या शासकीय रुग्णालयाचे नंबर, रक्त पेढ्यांचे नंबर उपल्बध करून देतात. त्या रुग्णाला हवा असणारा प्लाझ्मा शोधण्यासाठी स्वतःही अनेकांना फोन करतात, त्या रुग्णाच्या नातेवाईकांनाही प्लाझ्मा डोनार कसा शोधायचा याबाबत मार्गदर्शन करतात. तो रुग्ण ज्या गावातील रहिवाशी आहे त्या गावातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची यादी प्लाझ्मा शोधणाऱ्या नातेवाईकांना उपलब्ध करून देतात. तोडकर स्वतःही काही रक्तपेढ्यांशी बोलतात, इतर सामाजिक, राजकीय संस्थांशी संपर्क साधून त्या रुग्णाला प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात. जोपर्यंत रुग्णाला प्लाझ्मा मिळत नाही तोपर्यंत तोडकर फोन द्वारे त्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या सतत संपर्कात राहतात. आशा परिस्थितीमध्ये प्लाझ्मा शोधताना एका-एका रुग्णाच्या नातेवाईकांना तोडकर यांनी 10 ते 15 वेळा फोन केल्याचीही उदाहरणे आहेत.



          बऱ्याच वेळा ज्या रुग्णाला प्लाझ्मा लागतो त्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्लाझ्मा बद्दल व कोणत्या रक्तगटाच्या रुग्णाला कोणता रक्तगटाचा प्लाझ्मा चालतो याबाबत काही माहिती नसते. अशावेळी संबंधित अत्यवस्थ रुग्णाच्या गोंधळलेल्या नातेवाईकांना धीर देतना सचिन तोडकर प्लाझ्मा बाबत त्यांना सर्व माहिती देतात. 

       त्यात A+ve रक्तगटाच्या रुग्णाला A+Ve व AB+ve रक्तगटाचा प्लाझ्मा चालतो,  B+ve रक्त गटाच्या रुग्णाला B+ve व AB+ve रक्तगटाच्या प्लाझ्मा चालतो, AB+ve रक्तगटाच्या रुग्णाला फक्त AB+Ve रक्तगटाचाच प्लाझ्मा चालतो तर O+ve रक्तगटाच्या रुग्णाला सगळे म्हणजे A+ve, B+ve, AB+ve व O+ve रक्तगटाचा प्लाझ्मा चालतो ही बेसिक माहिती जरी रुग्णाच्या नातेवाईकांना मिळाली तरी त्यांना हव्या त्या रक्तगटाचा प्लाझ्मा डोनर शोधण्यात मदत होते. असे सचिन तोडकर यांनी सांगितले.

          प्लाझ्मा ची गरज लागल्यावर प्लाझ्मा डोनर शोधण्यापेक्षा आगोदरच प्लाझ्मा डोनर शोधून त्यांची रक्तगटानुसार नावनोंदणी करणे व एखाद्या रुग्णाला गरज पडल्यावर नोंदणी केलेला प्लाझ्मा डोनर त्या रुग्णाला देणे हा 'प्लाझ्मा दानाचा सचिन तोडकर पॅटर्न' कमालीचा फायदेशीर असून त्यातून कोरोनाच्या गंभीर रुग्णाला तात्काळ प्लाझ्मा डोनर मिळण्यास मदत होते व त्या रुग्णांचे प्राण वाचतात. असा तोडकर यांचा स्वानुभव आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्लाझ्मा दान अभियान सुरू करावे व त्यासाठी 'प्लाझ्मा दानाचा सचिन तोडकर पॅटर्न' राबवावा. रक्तगटानुसार प्लाझ्मा दात्यांची आगाऊ नावनोंदणी करावी व गरजू रुग्णांना तात्काळ प्लाझ्मा डोनर उपलब्ध करून घ्यावा. असे आवाहन सचिन तोडकर यांनी केले आहे.



       

 मंचर ला व्हावे प्लाझ्मा संकलन केंद्र- सचिन तोडकर

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी  अँडमिट असणाऱ्या कोरोनाच्या एखाद्या गंभीर रुग्णाला प्लाझ्माची गरज लागली व आम्ही त्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्लाझ्मा डोनर तात्काळ उपलब्ध करू दिला तरी या तिनही तालुक्यात प्लाझ्मा संकलन केंद्र नसल्याने प्लाझ्मा डोनरचा प्लाझ्मा काढण्यासाठी सदर प्लाझ्मा डोनरला पिंपरी - चिंचवड किंवा पुणे येथे घेऊन जाण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येते. या प्रकारात प्लाझ्मा डोनर सहजासहजी उपलब्ध असूनही प्लाझ्मा संकलन केंद्राभावी रुग्णाला प्लाझ्मा मिळण्यात पाच ते सहा तासांचा विलंब होतो. या सर्व बाबींचा विचार करून खेड, आंबेगाव, जुन्नर या तीनही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मंचर या ठिकाणी प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू करावे अशी मागणी प्लाझ्मा दान अभियानाचे प्रवर्तक सचिन तोडकर यांनी केली आहे.

      दरम्यान एनयुजे इंडिया वरिष्ठ नेते व एनयुजेएम मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी व एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी  सचिन तोडकर यांचे या उपक्रमा बद्दल अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies