बांधकाम व्यवसाय ठप्प ,बिगारी ,मजुरकर आर्थिक संकटात ! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

बांधकाम व्यवसाय ठप्प ,बिगारी ,मजुरकर आर्थिक संकटात !

 बांधकाम व्यवसाय ठप्प ,बिगारी ,मजुरकर आर्थिक संकटात !


संतोष सुतार-माणगांवjकोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसाय थांबला असून या क्षेत्रात काम करणारे बिगारी ,मजुरकर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉक डावून काळात बंद झालेला बांधकाम व्यवसाय अद्यापही सावरला नसून याचा मोठा परिणाम रोजंदारीवर काम करणारे ,बिगारी व मजुरकर यांच्यावर झाला आहे.गेले सहा महिने बांधकाम व्यवसाय बंद आहे.वाहतूक ,रेती व बांधकाम साहित्य उपलब्ध नाहीत ,अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत.कोरोनाच्या भीतीने अनेक परप्रांतीय मजुरकर आपापल्या गावी गेले आहेत.यामुळे बांधकाम व्यावसाय ठप्प आहे.या व्यवसायांवर अवलंबून असलेले व कोरोना काळात स्थलांतरित न झालेले कुटुंब व स्थानिक मजुरकर यांना यामुळे मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

दररोज मजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब अनेक दिवस काम नसल्याने मोठया आर्थिक संकटात सापडले आहेत.दररोज 400 ते 500 रुपये मजुरीवर काम करणारे बिगारी ,मजुरकर रोजचा रोजगार बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात असून मिळेल ते काम करण्यासाठी तयार आहेत.

कोरोना काळात गावकडेही कॉरोंटीन करत होते.त्यामुळे गावी गेलो नाही. गेले सहा महिने रोजगार नाही त्यामुळे मोठे आर्थिक संकट आले आहे.मिळेल ते काम करण्याची इच्छा आहे परंतु अजूनही बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू न झाल्याने रोजगार बुडत आहे.

मेहबुब-परप्रांतीय मजुरकर .


कोरोना साथीमुळे मोठ्या प्रमाणात बांधकामे थांबली आहेत.वाहतूक थांबल्यामुळे अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत.वाळू ,खडी मिळण्यास अडचणी आहेत.किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक बांधकामे बंद आहेत.येत्या काही दिवसांत बांधकामे सुरू होतील .

प्रसाद उभारे-बांधकाम व्यावसायिक ,माणगांव.

No comments:

Post a Comment