कोरोना काळात शहाळ्याना मागणी वाढली ,किमतीतही वाढ निसर्ग वादळाचाही फटका - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, September 19, 2020

कोरोना काळात शहाळ्याना मागणी वाढली ,किमतीतही वाढ निसर्ग वादळाचाही फटका

 कोरोना काळात शहाळ्याना मागणी वाढली ,किमतीतही वाढ निसर्ग वादळाचाही फटका 

संतोष सुतार-माणगांव
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहाळ्याना मागणी आहे. निसर्ग चक्रीवादळात बागांचे नुकसान झाले आहे यामुळे किमतीतही 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे.कोरोना साथीच्या महामारीने सर्वत्र वेगाने प्रसार होत आहे. योग्य आहार ,सामाजिक दुरी व रोग प्रतिकारक्षमता चांगली असल्यास या साथीपासून बचाव करता येतो तसेच कोरोना बाधित रुग्णांनाही योग्य आहार व पेय पानाचा सल्ला दिला जातो.

ही बाब लक्षात घेउन नैसर्गिक व आरोग्यास हितकारक अशा शहाळ्याना मागणी वाढली आहे.

किमान 10 ते 20 टक्के किमती वाढल्या आहेत. एक शहळा म्हणजे एक सलाईन असे म्हटले जाते.आरोग्यास हितकारक अशा शहळ्याच्या पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून कोरोना साथीत शहाळ्याना मागणी वाढली आहे.निसर्ग चक्रीवादळात नारळाच्या बागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याने शहळ्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर शहाळ्याना मागणी आहे.निसर्ग वादळात नारळाच्या बागांचे नुकसान झाले आहे व मागणी जास्त असल्याने किमतीतही 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे.

प्यारेलाल जैस्वाल , विक्रेते -माणगांव

शहाळ   पूर्वी        आता 

 लहान  20           25

मध्यम   20 ते 30  35 

मोठा    30            40 ते 50


No comments:

Post a Comment