वृक्षारोपणाने वाघोळीच्या सौंदऱ्यात आणि ऑक्सिजन पातळीत होणार वाढ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

वृक्षारोपणाने वाघोळीच्या सौंदऱ्यात आणि ऑक्सिजन पातळीत होणार वाढ

                ग्रीन पुणे क्लीन पुणे

वृक्षारोपणाने वाघोळीच्या सौंदऱ्यात आणि ऑक्सिजन पातळीत होणार वाढ

तरोनिश मेहता-पुणे


वाघोली हाऊसिंग सोसायटी असोसिएशन (डब्ल्यूएचएसए) आणि ग्रीन सनराईज हिल्स वाघोली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली रोटरी क्लब ऑफ वाघोलीच्या सदस्यांनी वाघोलीच्या सुशोभिकरणासाठी आणि ऑक्सिजन वाढीसाठी सुमारे 4000 ते 4500 रोपट्यांसह वृक्षारोपण मोहीम राबविली   रोपांमध्ये बोगेनवेल ,कान्हर (पिवळ्या ऑलेंडर) आणि सायकस आदी झाडांचा समावेश आहे.
 वाघोली हाऊसिंग असोसिएशनचे सदस्य संजीवकुमार पाटील हे उपक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून शिरुर मतदार संघाचे सदस्य अशोक पवार, सदस्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. 


 संजीवकुमार पाटील यांनी पुढे नमूद केले की सध्या वाघेश्वर मंदिरातून केशनंद फाटा रोड पर्यंत वृक्षारोपण केले जाते, परंतु केशानंद फाटा रोड ते बकोरी फाटा जंक्शनपर्यंत लवकरच वृक्षारोपण केले जाईल. तेथील रहिवाशांनी वाघोली ग्रामपंचायतींना अधिकाधिक रोपे उपलब्ध करुन देण्याची विनंती केली असून वाघोली हाऊसिंग असोसिएशन (डब्ल्यूएचएसए) देखील पाण्याचे टँकर्स देण्याचे योगदान देत आहेत. ग्रीन पुणे आणि क्लीन पुणे उपक्रमाच्या  दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे.असं बोललं जातंय.

No comments:

Post a Comment