वारुंजी गावच्या वेशीवरच घाणीचे साम्राज्य ... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 6, 2020

वारुंजी गावच्या वेशीवरच घाणीचे साम्राज्य ...वारुंजी गावच्या वेशीवरच घाणीचे साम्राज्य ...

हेमंत पाटील-पाटण(सातारा)


स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळालेल्या कराड शेजारील वारूंजी गावाच्या प्रवेशाला च घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे...ह्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे... यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.. कोरोना सारखी भयानक परिस्थिती निर्माण झाली असतानाही ह्या घाणीच्या साम्राज्याला कोणी वाली आहे की नाही हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे कराड शहर नुकतेच देशांमध्ये स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे मात्र जवळच असलेल्या वारुंजी गावाच्या प्रवेशाला जवळच कचऱ्याचे साम्राज्य उभे राहिले आहे सध्या कराडमध्ये व आजूबाजूच्या परिसरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले आहे व सर्व ठिकाणी हॉटेल बस स्टेशन सरकारी ऑफिस नगरपालिका ग्रामपंचायत या सर्वच ठिकाणी स्वच्छता राखली जाते मात्र रस्त्याकडेला अशाप्रकारे कचरा करून आपण स्वतः कोणत्या ना कोणत्या रोगाला आमंत्रण देत आहोत तरी या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जावी असे जवळील नागरिकांकडून बोललं जातंय ,तसेच येथे कुत्र्यांचा वावर वाढला असून एक लहान मुलगा कचरा टाकताना दिसत आहे मात्र यात कचरा कुंडी जवळ एखाद्या कुत्र्याने या लहानग्या मुलाला चावा वगैरे घेतला तर पुढील परिस्थितीला कोण जबाबदार राहील असा प्रश्न स्थानिक विचारतायेत. मात्र आजूबाजूच्या परिसरातील नागरिक संतापले असून लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे


No comments:

Post a Comment