Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वेळास - आदगाव रस्ता मंजूर मात्र लॉकडाऊन मुळे रखडला .

 वेळास - आदगाव रस्ता मंजूर मात्र लॉकडाऊन मुळे रखडला .


अमोल चांदोरकर - श्रीवर्धन


श्रीवर्धन तालुक्यातील वेळास - आदगाव मार्गावरील रस्ता खचत जात असल्याचे दिसते. सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हा रास्ता मंजूर झाला असून लोकडाऊन मुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काम सुरु झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. 


श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन दृष्टीकोनातून प्रमुख असे समुद्रकिनारे विशेषता प्रसिद्धीस आले आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कोंडविल या किनार्यांचा समावेश आहे. त्यातच, वेळास व आदगाव समुद्रकिनारा देखील पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. कारण या समुद्र किना-याचे वैशिष्ट म्हणजे हा खडकाळ समुद्रकिनारा आहे. खडकावर आपटणार्या सागरलाटा पर्यटकांस आक‍र्षि‍त करतात. त्यामुळे पावसाळी पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांचीही गर्दी या ठिकाणी होते. दिवेआगरहून मुरूड जंजिऱ्याकडे जाताना दिघी रस्त्याला अलिकडेच एक वेळास फाटा येथून दोन कि.मी.वर हा समुद्रकिनारा आहे. लोकडाऊन हळूहळू उठू लागल्याने प्रवाशांची वर्दळ आता वाढत आहे. मात्र, सद्यस्थितीत वेळास - आदगाव या मार्गावर चार मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता खचण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जातेय.


वेळास पासून आदगाव हा मार्ग पूर्ण समुद्र लगत आहे.  रस्त्यालगत संरक्षक भिंत आहे मात्र तीही पूर्ण मोडकळीस आली आहे. समुद्राच्या जोरदार क्षारयुक्त लाटांमुळे रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. मुळात खड्डे हे रस्त्यावर आहेत. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण पडण्याची भीती आहे. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर वेळास व आदगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटू शकतो. आदगाव जाणाऱ्या मार्गातून प्रवास करतेवेळी  वाहन चालकाला रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फुट खोल असताना त्याच खड्डयाच्या  बाजूला  रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच काम सुरु करावा अशी मागणी वाहनचालक करत आहेत. यावर्षी डागडुजी नाहीच : 

सागरी मार्ग म्हटल्यावर समुद्राची भरती ओहोटी लाटांचा मारा ह्या गोष्टी लक्षात घेतल्यास रस्त्याची वारंवार करावी लागणारी देखभाल न झाल्याने वेळास आदगाव रस्ता पूर्ण पणे खचला आहे . मुख्य जिल्हा मार्ग असल्याने रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे.  वेळास येथील खचलेल्या रस्त्यावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खाते माती टाकून भराव करते मात्र पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रास्ता खचतो. लवकरच कायमस्वरूपी पक्के रस्ते व्हावे ही मागणी आहे.  - धवल तवसालकर, वेळास ग्रामपंचायत सदस्य. 
वेळास - आदगाव रस्त्याची मंजुरी मिळाली आहे. शिवाय संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांची निधी देखील मंजूर झाला आहे. लोकडाऊन मुळे कामास उशीर झाला मात्र लवकरच रस्त्याचे काम सुरु होऊ शकेल.  


- श्रीकांत गणगणे, उपअभियंता - सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies