मनोज खेडकर राजकारण विरहित निस्वार्थी व्यक्तिमत्त्व - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

मनोज खेडकर राजकारण विरहित निस्वार्थी व्यक्तिमत्त्व

 मनोज खेडकर राजकारण विरहित निस्वार्थी व्यक्तिमत्त्व !


चंद्रकांत सुतार--माथेरानअवघड प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत मदतीसाठी धावून जाणारे माथेरान मधील एकमेव निस्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर.

सध्या सर्वत्रच कोरोना या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्याने माथेरान मधील सर्वसामान्य लोकांना पुढील उपचारासाठी मुंबई अथवा अन्य ठिकाणी जावे लागते परंतु वेळेवर बेड उपलब्ध होत नसतात अशावेळी एकच नाव सर्वांच्या समोर उभे राहते ते म्हणजे मनोज खेडकर. आपल्या ओळखीच्या माध्यमातून आजवर अनेक रुग्णांची सोय आणि विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा काहींना सवलतीच्या दरात सुध्दा औषधोपचार मिळवुन दिले आहेत.ताबडतोब बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.आणि प्रत्यक्ष त्या रुग्णांची वेळेवर जाऊन विचारपूस करून काही मदत लागल्यास हसतमुखाने त्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे येथील कोरोना बाधित अनेक रुग्णांनी लाभ घेऊन बरे होऊन आले आहेत.

केवळ दवाखान्याच्या सेवेपुरता मर्यादित न राहतान शैक्षणिक कार्यात सुध्दा त्यांचा मोठा हातभार इथल्या अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभला आहे. ज्यांची मुंबई पुण्यात कुठल्याही प्रकारची सोय नाही अशांना वेळोवेळी सहकार्याची भूमिका त्यांनी पार पाडली आहे.

त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

मनोज खेडकर एक असामान्य निस्वार्थी व्यक्तिमत्त्व माथेरान करांना लाभलं आहे हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल असे धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी सांगितले.

----------------------------------------

खेडकर साहेब कायम सामाजिक बांधीलकी आपण जपता.हॉस्पिटल, शिक्षण,कोर्ट कचेरी,नगरपालिका, व माणसानं आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध होतात. काँग्रेस परिवाराचे खऱ्या अर्थाने आपण कुटुंब प्रमूख आहे. आमच्या साठी कायम संकट काळी संकट मोचक आहे. मागील अनेक दिवसापासून आपण रात्री अपरात्री आपली मदत साठी धावत आहे निश्चित ही समाज सेवेचे दायित्व आपण फार पडत आहे.परंतु आपण सुध्दा अधिकची काळजी घेतली पाहिजे. आपला ही परिवार आहे.

शिवाजी शिंदे --विरोधी पक्षनेते माथेरान नगरपरिषद


कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सेवेकरिता आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन येथील नागरिकांना शक्य होईल ती मदत व योग्य मार्गदर्शन करत आहात खरोखरच आपल्या या उल्लेखनीय कामगिरीचा आम्हा माथेरानकरांना सार्थ अभिमान वाटतो .यापूर्वीसुद्धा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करत आलात हे सर्वांना ज्ञात आहे ! म्हणतात ना जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा ! आपल्या कर्तुत्वाला सलाम !

चंद्रकांत जाधव -- नगरसेवक माथेरान नगरपरिषद


खेडकर साहेब खरंच या कोरोना महामारी मध्ये सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे लोकांची मदत करत आहात याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो.आणि आम्ही अशा माणसा सोबत आहोत की जे अडचणीत असणाऱ्या माणसाला शेवट पर्यंत मदत करतात.म्हणून तुमच्या सारख्या नेता आमच्या सोबत असल्याचा गर्व आहे.साहेब तुम्ही सुद्धा स्वतः ची काळजी घ्या.

हेमंत पवार -सभापती माथेरान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माथेरान


No comments:

Post a Comment