Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

NEET परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन

 NEET परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन

डॉक्टर महेश खुस्पे कोटा अकॅडमी कराड संचालक


कुलदीप मोहिते -कराड


 येत्या १३ सप्टेंबर रोजी देशभरात मेडिकलला जाण्यासाठी नीट ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा होणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या वेळी काय करावे लागेल, कधी जायचे आहे, ड्रेस कोड काय आहे, कोणकोणती कागदपत्रे बरोबर घेऊन जायला हवीत असे अनेक प्रश्न पालक व विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे नाही म्हटले तरी मनावर काहीसा ताण असतो. त्यादृष्टीने कराड येथील प्रसिध्द कोटा अ‍ॅकॅडमी / कोटा ज्युनिअर कॉलेजचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी केलेल्या उपयुक्त सूचना...

१) एन. टी. ए. मार्फत आलेले प्रवेश पत्र ज्यामध्ये सेल्फ डिक्लरेशन अंडरटेकिंग आहे, ते स्वहस्ताक्षरात सही करून द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, धाप लागणे यासारखी लक्षणे असल्यास तसा उल्लेख करावा लागणार आहे. तसेच तुम्ही जर कोविड १९ रुग्णाच्या संपर्कात आला असाल, तर तसा उल्लेख करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला काही ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर तसा उल्लेख करायचा आहे. जर वरील कोणतेच नसेल तर मग सी कॉलममध्ये दिलेल्या चेक बॉक्समध्ये टिक करा. तुमचे प्रवेश पत्र ३ पानाचे आहे. ते सगळे बरोबर घेऊन जायचे आहे. 


२) बरोबर एक पासपोर्ट साईज फोटो, जो तुम्ही प्रवेश पत्रावर अपलोड केलेला आहे, तोच असणे गरजेचे आहे. 


३) प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी उठवणे गरजेचे आहे.  


४) प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकीटवर आधी सही करु नये. ही सही पर्यवेक्षकाच्या समोर करावयाची आहे. आधी सही करून गेलात तर तुम्हाला प्रवेश नाकारु शकतात याची नोंद घ्यावी. हॉल तिकिटाची एक प्रत घरी काढून ठेवावी. कारण तुमचे हॉल तिकीट जमा करून घेतले जाणार आहे. 


५) परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद असतात याची नोंद ठेवावी. 


६) हॉल तिकीटसोबत शासनाने दिलेले ओरिजनल फोटो आयडी कार्ड, जसे की आधार / पॅन / १२ वीचे हॉल तिकीट / पासपोर्ट यापैकी कोणतेही एक बरोबर ठेवा. इतर कोणतेही फोटो आयडी कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच झेरॉक्स काढलेले व अटेस्टेड केलेले / मोबाईलवरील कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. 


७) दिव्यांग विद्यार्थ्यांने सोबत त्याचे दिव्यांगांचे प्रमाणपत्र (सिव्हिल सर्जनचे) असणे गरजेचे आहे. 


८) ड्रेसकोड हा फॉर्मल असावा. हाफ बाह्यांचा शर्ट असावा. लांब बाह्यांचा शर्ट / टी शर्ट / कुर्ता चालणार नाही. मोठ्या बटणाचा शर्ट चालणार नाही . 


९) अंगावर कोणताही दागिना चालणार नाही, जसे की ईअर रिंग / अंगठी / बांगडी / चेन / पैंजण इत्यादी. 


१०) हॉल तिकिटावर काहीही लिहू नये. 


११) पारदर्शक पाण्याची बाटली नेऊ शकता. (रंगीत किंवा अपारदर्शक चालणार नाही.)


१२) ५० मिली सॅनिटायझर बॉटल शक्यतो जेल स्वरूपात न्या. कारण चुकून परीक्षा देत असताना जर टेबलावर सांडली तर दुसरी ओएमआर शीट मिळणार नाही. 


१३) डिस्पोझेबल मास्क व हॅन्ड ग्लोव्हज बरोबर न्या. कारण तुमचा मास्क तिथे काढून घेतला जाणार असून तुम्हाला दुसरा मास्क मिळणार आहे. तिथे मिळालेल्या मास्कला तुमच्या सॅनिटायझरने आधी साफ करून घ्या. मग नंतरच परिधान करा.


१४) रिपोर्टिंग / एन्ट्री टायमिंगलाच केंद्रावर पोहोचा. 


१५) सकाळी हलकासा आहार करून जा. कारण संध्याकाळी ५ वाजल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. सोबत पाण्याऐवजी सरबत नेले तर जास्त बरे होईल. कारण त्यातील लिंबू व साखरेने थोडे तरतरी आल्यासारखे वाटेल. सोबत थोडे मनुके खाऊन जा. म्हणजे लगेच भूक लागणार नाही. 


१६) सोबत नेलेल्या सॅनिटायझर्सने आधी आपला बेंच साफ करून घ्या. 


१७) फक्त चप्पल घालून जाणे, सँडल किंवा शूजवर बंदी आहे. 


१८) मोबाईल बरोबर नेऊ नये. मोबाईल ठेवण्याची सोय नाही. 


१९) जर तुमच्या शरीराचे तापमान निर्धारित तापमानापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वेगळ्या आयसोलेशन कक्षामध्ये बसावे लागेल. त्यावेळी घाबरून जाऊ नका. शांतपणे परीक्षा द्या. 


२०) अस्वस्थ वाटल्यास डीप ब्रीदिंग करा. 


२१) प्रत्येक विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग टाइम हा वेगवेगळा आहे. त्यामुळे आपल्या मित्राचा रिपोर्टिंग टायमिंग काय आहे यावर आपले जाणे  ह हे ठरवू नका


सध्या अख्खे जग हे कोरोना सारख्या महामारी लढत आहे जगाला तुमच्यासारख्या डॉक्टरांची तीव्र गरज भासणार आहे असे मत डॉक्टर खुस्पे यांनी व्यक्त केले व  नीट एक्झाम ला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies