नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज स्व. बाळकृष्ण नारायण मालुसरे यांच्या पत्नी श्रीमती पार्वतीबाई मालुसरे यांचे निधन
Team Maharashtra Mirror10/07/2020 10:01:00 AM
0
नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज स्व. बाळकृष्ण नारायण मालुसरे यांच्या पत्नी श्रीमती पार्वतीबाई मालुसरे यांचे निधन
उमेश पाटील -सांगली
बेळगांव (रघुनाथ पेठ,अनघोळ) येथील श्रीमती पार्वतीबाई बाळकृष्ण मालुसरे (वय ८२ वर्षे) यांचे आज (बुधवारी) सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर चिदंबारनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अत्यंत शांत,शोषिक,व कुटुंब वत्सल होत्या. त्यांनी आपले पती,नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण नारायण मालुसरे यांना तानाजी मालुसरे,व पारगडाचा इतिहास प्रकाशात आणण्यात मोलाची साथ दिली होती. त्यांच्या पश्चात नातू,सून,पाच मुली, जावई,व नातवंडे असा परिवार आहे. त्या नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज रायबा शिवराज मालुसरे यांच्या आजी, इतिहासाच्या अभ्यासक, कवियत्री प्रा.डॉ.शीतल शिवराज मालुसरे,व आविष्कार कल्चर ग्रुप (इस्लामपूर) चे सचिव राजेंद्र घोरपडे (भाऊ) यांच्या सासूबाई होत. रक्षा विसर्जन गुरुवार दि. ८ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी चिदंबारनगर स्मशान भूमीत होणार आहे.