कुपोषीत मुलांच्या मदतीसाठी सरसावली मुंबईची "प्ले अँन्ड शाइन फाउंडेशन" - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

कुपोषीत मुलांच्या मदतीसाठी सरसावली मुंबईची "प्ले अँन्ड शाइन फाउंडेशन"

 कुपोषीत मुलांच्या मदतीसाठी सरसावली मुंबईची "प्ले अँन्ड शाइन फाउंडेशन"

 आमदार महेंद्र थोरवेच्या हस्ते करणार पोषण आहाराचे वाटप

तीस तीव्र कुपोषित मुलांना करणार आहाराची मदत

ज्ञानेश्वर बागडे-कर्जतकर्जत तालूक्यातील तीव्र कुपोषित मुलांच्या मदतीसाठी मुंबई येथील सामाजीक संस्था प्ले अँन्ड शाइन फाउंडेशन सरसावली असुन या फाँउडेशनच्या वतीने शनिवार दिनांक 24ऑक्टोबर रोजी पोषक आहार वाटप करणार आहेत .

  कर्जत पालीकेचे नगरसेवक संकेत भासे यांनी केलेल्या विनंतीवरून फाँउडेशन मदत करायला तयार झाले आहे .मागील महिन्यात याच फाँउडेशनच्या वतीने शिरसे येथील आदिवासी मुलाना हँपिनेस बाँक्सचे वाटप केले होते ,त्या वेळीच प्ले अँन्ड शाइन फाउडेन संस्थेचेचे अध्यक्ष सार्थक वाणी यांनी कुपोषीत मुलांना मदत वाटप करण्याची घोषणा केली होती ,त्या नूसार दिनाक 24 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तीस तीव्र कुपोषीत मुलांना पोषक आहार वाटप करण्यात येणार आहे .

कर्जत खालापुरचे विधानसभा सदस्य आ.महेंद्र थोरवे यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कडाव येथे पाच मुलांना आहार वाटप करण्यात येईल.उर्वरीत मुलांना घरपोच आहार घरपोच केला जाणार आहे .


  कर्जत पालीकेचे नगरसेवक संकेत भासे यांचे वतीने सर्वच कुपोषीत मुलांना महिनाभर पूरतील एवढी अंडी देण्यात येणार आहेत .

       कर्जत पंचायत समितीचे गटविकास आधिकारी बालाजी पूरी ,तालुका आरोग्य अधिकारी डाँ .चंद्रसेन मोरे ,प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर ,कँन प्रकल्पाचे समन्वयक व दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले , सुपरवायझर ,अगंवाडी सेविका उपस्थित राहणार आहेत .

No comments:

Post a Comment