महेंद्र थोरवे उद्याच्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागणार का?
संतोष दळवी - कर्जत
महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची उद्या सकाळीच पत्रकार परिषद असून त्यात कोणावर तोफ डागणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.महायुतीत झालेली बंडखोरी आणि या बंडखोरीला खतपाणी कोणी घातलं का? यावर उद्या थोरवे बोलतात का? हे उद्याच समजेल मात्र महायुतीतील एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आणखी एका बंडखोर उमेदवारामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली असल्याने यावर थोरवे काय भाष्य करतात हे कर्जत खालापूरकरांसाठी औत्सुक्याचे असणार आहे.याकडे कर्जत खालापूरकरांचे लक्ष लागून राहिलं आहे.
महेंद्र थोरवे हे आक्रमक भाषणासाठी प्रसिध्द आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात फार कटुता असून त्यात भर म्हणजे अजित पवार गटातून ही बंडखोरी झाल्याने या बंडखोरी वर उद्या थोरवे मिडीयाला जबर मसाला देतील अशी अटकळ बांधली जाते. एका स्थानिक युटुब वृत्तवाहिनीला मुलाखत देताना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी ५तारखेची पत्रकार परिषद आणि महविकास आघाडीपेक्षा बंडखोर किंवा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे आव्हान असल्याचे सूतोवाच केलं होत त्यानुसार उद्या थोरवे उद्या काय बोलतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.