ठरले प्रशासनाचे सुपरहिरो"सहा.पोलीस निरीक्षक धर्मराज सोंनके" - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, July 24, 2020

ठरले प्रशासनाचे सुपरहिरो"सहा.पोलीस निरीक्षक धर्मराज सोंनके"

ठरले प्रशासनाचे सुपरहिरो"सहा.पोलीस निरीक्षक धर्मराज सोंनके"
अमूलकुमार जैन-महाराष्ट्र मिरर मुरुड
अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात ग्रामस्थांनी (दिं.22) रोजी गदारोळ करीत प्रशासकीय अधिकार्‍यांना गावातून हाकलून देण्यात आले होते.मात्र बोडणी ग्रामस्थ यांची मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज  सोंनके यांनी प्रथम समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्याला ग्रामस्थांनी दाद लागू दिली नाही.तदनंतर मात्र
सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज  सोंनके यांनी यांनी आपला खाक्या दम दाखवीत ग्रामस्थांना वठणीवर आणले.त्यामुळे बोडणीकरांनी आपला माफिनामा लिहून प्रशासनाला दिला आहे.त्यामूळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज  सोंनके हे रायगड पोलीस दलासाहित जिल्हा प्रशासनाचे सुपर हिरो ठरले आहेत.
कोरोनाचे 72 पॉझिटीव्ह रुग्ण बोडणी गावामध्ये आहेत. काहींवर घरी तर काहींवर केअर युनिट मध्ये उपचार सुरु आहेत. मात्र कोरोना बाधित असूनही अनेकजण गावात मुक्तपणे वावरत असल्याची तसेच कुठलेही नियम पाळत नसल्याची तक्रार आरोग्य विभागाने केली होती. त्यानुसार बुधवारी (22 जुलै) अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ हे समजूत घालण्यासाठी अधिकार्‍यांसह गावात गेले होते.
   या अधिकार्‍यांना पाहताच ग्रामस्थांनी पारा चढवीत  केला. या  अक्षरशः गावातून हुसकावून लावण्यात आले. थुंकण्याचे प्रकार झाल्याचेही म्हटले जाते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अशावेळी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी सायंकाळी गावकर्‍यांची समजूत काढली.

No comments:

Post a Comment